जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा लगेच अंघोळ करत असाल तर थांबा! जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर शरीर स्वच्छ करण्यासाठी अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे आरोग्यासोबतच मनाला सुद्धा अनेक फायदे होतात. अंघोळ केल्यानंतर मन आणि शरीर प्रसन्न वाटू लागते. दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्या आहेत. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आहार, पाणी पिण्याच्या सवयी आणि आरोग्यासंबंधित अनेक गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे दीर्घकाळ निरोगी आणि फिट राहण्यासाठी अनेक लोक आयुर्वेदिक उपाय फॉलो करतात. पण बऱ्याचदा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, ज्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेक लोक जेवल्यानंतर लगेच अंघोळीला जातात. ही सवय चुकीची आहे. जेवल्यानंतर लगेच अंघोळीला जाऊ नये. यामुळे आरोग्याला हानी पोहचते. जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ? जेवल्यानंतर अंघोळ केल्यास शरीराला होणारे तोटे.(फोटो सौजन्य – istock)
जेवल्यानंतर शरीरातील रक्त डायजेस्टिव सिस्टीमकडे वळते, ज्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. पण जेवल्यानंतर अंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होते. तसेच शरीराच्या रक्तप्रवाह त्वचेकडे वळतो. यामुळे पचनक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. तसेच जेवल्यानंतर लगेच अंघोळ केल्यामुळे पचनक्रिया अतिशय स्लो होऊन जाते.
अंघोळ करताना काही लोक थंड पाण्याचा वापर करतात तर काही गरम पाण्याचा वापर करतात. पण थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊन जाते. याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे ऍसिडिटी वाढणे, अपचन किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर लगेच अंघोळ करू नये.
शरीराची पचनक्रिया स्लो झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी चुकीच्या वेळी अंघोळ करू नये. जेवल्यानंतर थेट अंघोळ केल्यास शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात.
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, जेवल्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनंतर तुम्ही अंघोळ करू शकता. यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते.तसेच अन्नपचन करण्यासाठी शरीराला योग्य तो वेळ मिळतो. याशिवाय शरीरावर अधिक दबाव येत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच अंघोळ करू नये.
गरम पाण्याने आंघोळ केल्यास काय होते?
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान आणखी वाढते, ज्यामुळे पचनक्रिया अधिक मंद होऊ शकते.
हलके जेवणानंतर लगेच आंघोळ करता येते का?
हलके जेवणानंतर लगेच आंघोळ करणे टाळलेलेच बरे, पण जर करायचेच असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणे थोडे सुरक्षित आहे.
जेवणानंतर किती वेळाने अंघोळ करावी?
जेवणानंतर साधारणपणे १-२ तास थांबून मग आंघोळ करावी, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे.