
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. फाटकी अन् मळकी असलेली ही जिन्स तुम्ही टाकून द्याल पण ही जीन्स न्यू मेक्सिकोमध्ये 62 लाख रुपयांना विकण्यात आली. तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की जीन्स खुप जास्त जुनी आहे, मळकी आहे एवढंच काय तर फाटकी आहे. ओल्ड फॅशन असलेल्या लेव्हिस कंपनीच्या या जीन्सचा लिलाव झालाय. लिलावतात डिओगोच्या एका क्लोथिंग डिलरने डेनिम डॉक्टर्सचे मालक जीप स्वीवनसनसोबत मिळून ही जीन्स विकत घेतली.