आर माधवनच्या तरूण त्वचेचं रहस्य (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
भारतीय अभिनेता आर माधवनच्या जबरदस्त अभिनयाने संपूर्ण देशाला त्याचा चाहता बनवले आहे. आजही त्याच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा तितकाच दबदबा असल्याचे दिसून येते. भारतात असा कोणीही व्यक्ती नसेल ज्याला तो किंवा त्याचा अभिनय आवडत नाही. पण माधवन त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी प्रसिद्ध आहे. कारण माधवन ५५ वर्षांचा आहे आणि तरीही त्याच्या त्वचेवरून त्याचं वय दिसून येत नाही. इतकंच नाही तर आजही त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग नाहीत.
बरेच लोक असतील ज्यांना आर माधवनसारखी तरुण आणि डागरहित त्वचा हवी असेल. पण यासाठी नक्की काय करायचं ते माहीत नाही. इतकंच नाही तर अनेकजण यासाठी महागडी रासायनिक उत्पादनेदेखील वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की माधवन त्याच्या त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांपेक्षा आयुर्वेदावर जास्त विश्वास ठेवतो. हो, तुम्ही वाचलं ते खरं आहे. त्याने त्याच्या एका मुलाखतीत हे रहस्य उघड केले आहे (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
तिळाच तेल आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त! नक्की वाचा
आयुर्वेदावर विश्वास
माधवनचा आहे आयुर्वेदावर अधिक विश्वास
आर माधवनची एक सिरीज येत असून सध्या तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या अभिनेत्याने त्याच्या मुलाखतीत सांगितले की तो गेल्या २० वर्षांपासून आयुर्वेदिक रेसिपी फॉलो करत आहे. त्याच्या निरोगी त्वचेचे आणि मजबूत केसांचे रहस्य म्हणजे त्याची चांगली जीवनशैली असंही तो म्हणाला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी कोणती आयुर्वेदिक रेसिपी आहे जी त्वचेची आणि केसांची इतकी चांगली काळजी घेते. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
माधवनचा आयुर्वेदिक उपाय
खरंतर, आर माधवन गेल्या २० वर्षांपासून आयुर्वेदिक फॉर्म्युला वापरत आहेत. त्याचा दावा आहे की या फॉर्म्युलामुळे त्याच्या त्वचेला आणि केसांना खूप फायदा झाला आहे. यासाठी फक्त तिळाचे तेल लागते असे त्याने सांगितले.
आठवड्यातून एकदा तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरावर तीळाचे तेल लावावे लागेल आणि काही वेळ ते ठेवून आंघोळ करावी लागेल असे त्याने यावेळी स्पष्ट केले. यामुळे तुमची त्वचा माधवनसारखीच तरुण आणि कसदार होईल. तसेच केसांनाही ताकद मिळेल. याशिवाय आपण या तेलाचे फायदे जाणून घेऊया.
आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करा, मिळतील अनेक फायदे, वाचा सविस्तर
तिळाच्या तेलाचे फायदे
तिळाच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे
काय म्हणाला माधवन