
अभिनेत्री प्राजक्ता माळी वयाच्या ३६ व्या वर्षीसुद्धा कायमच दिसते तरुण!
प्राजक्ता माळीच्या फिटनेसचे रहस्य?
मांसाहार सोडण्यामागील शास्त्रीय कारण?
दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी सोप्या टिप्स?
अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची क्रश आहे. अभिनयासोबतच तिच्या फिटनेस आणि फॅशनचे लाखो चाहते आहेत. वयाच्या ३६ व्या वर्षीसुद्धा प्राजक्ता माळी खूपच तरुण दिसते. अभिनेत्रींच्या ग्लॅमर्स आयुषमागे प्रचंड मेहनत आणि कडक शिस्त असते, हे प्राजक्ता माळीच्या दिनचर्येतून कायमच दिसून येते. ती रात्री उशिरापर्यंत जगण्याऐवजी योग्य जीवनशैली फॉलो करून हेल्दी आणि फिट आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी शाहाकारी आहे. दिनचर्येत होणाऱ्या बदलांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच चुकीची जीवनशैली फॉलो न करता योग्य जीवनशैली फॉलो करून नेहमीच तरुण आणि सुंदर राहण्यावर भर द्यावा. प्राजक्ता केवळ पौष्टिक आहाराचं नाहीत मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा कायमच व्यायाम आणि योगासने करते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्राजक्ता माळीच्या तरुण चेहऱ्याचे आणि फिटनेसचे रहस्य सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. प्राजक्ता माळीच्या मते, ८ तासांची शांत झोप ही आरोग्यासाठी अतिशय चांगली गुंतवणूक आहे. रात्री मोबाईल बघत जागे राहिल्यास चेहऱ्यावर तरुण आणि चमकदारपण मिळवणे अशक्य आहे. त्यामुळे जमेल तितक्या लवकर रात्रीची शांत झोप घेऊन सकाळी पहाटे उठावे. पहाटे लवकर उठल्यामुळे शरीराला नैसर्गिकरीत्या पुनरुज्जीवन मिळते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो.
सकाळी उठल्यानंतर नियमित २० मिनिटं मेडिटेशन करावे. मेडिटेशन केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. मेडिटेशन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो, मनावरील एकाग्रता वाढते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कोणत्याही महागड्या स्किन केअरची आवश्यकता नाही. ध्यान केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो टिकून राहतो.
दैनंदिन आहारात कायमच ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. ताजे अन्नपदार्थ सहज पचन होतात. तेवढे ताजे अन्नपदार्थ खाल्लं तेवढाच चेहऱ्यावर ग्लो कायम टिकून राहील. शिळे अन्न किंवा पॅकेज्ड फूड खाल्ल्यानंतर शरीरावर अतिरिक्त तणाव येतो. याशिवाय अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत. त्यामुळे कायमच ताज्या आणि स्वच्छ अन्नपदार्थांचे सेवन करावे.
प्राजक्ता माळी मांसाहारी पदार्थांचे अजिबात सेवन करत नाही. तिने मांसाहार खाणे सोडले आहे. तिच्या मते, मानवी पचनसंस्था मांसाहार पचवण्यासाठी नैसर्गिकरीत्या बनलेली नाही. चिकन मटण खाल्ल्यानंतर ते पचन होण्यासाठी शरीराला सुमारे ७२ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे पचनसंस्थेवर तणाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे पचनास हलका आणि ऊर्जा निर्माण करणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करावे.