गर्भातील बाळावर प्रदूषणाचा परिणाम! गरोदरपणात वायू प्रदुषणापासून कसा बचाव करावा?
वाढत्या प्रदूषणामुळे लोकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. गर्भात वाढणाऱ्या बाळावरही प्रदूषणाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की गर्भधारणेदरम्यान आई ज्या वातावरणात राहते. त्याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या विकासावर होतो. आशा आयुर्वेदाच्या डायरेक्टर डॉ. चंचल शर्मा यांनी सांगितले की, गर्भवती महिला ज्या वातावरणात श्वास घेते, त्या ठिकाणची हवा प्रदूषित असेल तर त्यातील हानिकारक कण आणि विषारी तत्व फुप्फुसांमार्फत आईच्या रक्तात मिसळतात. हेच रक्त प्लेसेंटामार्फत गर्भातील बाळापर्यंत पोहोचतं आणि त्याच्या विकासावर परिणाम करते. (फोटो सौजन्य – istock)
प्रदूषित हवेत राहिल्यामुळे गर्भातील बाळाच्या एकूण विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे अकाली प्रसूतीचा धोका वाढतो, बाळाचे जन्मावेळी वजन कमी असू शकते आणि गर्भपाताचा धोका देखील वाढतो.
काही अभ्यासांमध्ये असेही आढळले आहे की प्रदूषित हवेमुळे बाळाच्या फुफ्फुसांचा आणि मेंदूचा विकास नीट होत नाही, ते कमकुवत राहू शकतात. जन्मानंतर अशा मुलांमध्ये दमा, अॅलर्जी यांसारख्या आजारांची शक्यता अधिक असते.
बहुतेक लोक वायुप्रदूषणाबाबत जागरूक असतात, पण पाण्याचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचाही गर्भातील बाळाच्या विकासावर परिणाम होतो, हे अनेकांना माहिती नसतं. प्रदूषित पाण्यात नुकसानकारक बॅक्टेरिया आणि कीटकनाशके असू शकतात, जे गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांनाही इजा पोहोचवू शकतात.
गर्भातील बाळाला आईपासून ऑक्सिजन पुरवठा होतो. पण जेव्हा आई दूषित वातावरणात किंवा हवेच्या गुणवत्ता खराब असलेल्या ठिकाणी जाते, तेव्हा दुषित हवा बाळापर्यंत पोहोचते आणि बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. यामुळे वेळेआधीच डिलिव्हरी होण्याची शक्यता असते. यामुळे जन्माला आलेल्या बाळाचे वजन अतिशय कमी असून बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. याशिवाय दूषित हवेच्या सानिध्यात राहिल्यामुळे बाळाला पुढे जाऊन डायबिटीज, कार्डियोवस्कुलर रोग किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.
हिवाळ्यात किडनी नाही सडणार, दैनंदिन जीवनशैलीत 5 सवयींना कवटाळा; निरोगी रहा
गरोदरपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय करावेत. घरातील हवा साफ ठेवण्यासाठी एयर प्यूरिफायरचा वापर करावा. याशिवाय खिडकीत झाडे लावा जेणेकरून नैसर्गिकरीत्या हवा स्वच्छ राहते. शहरात राहणाऱ्या महिलांनी गरोदरपणात आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. याशिवाय घराबाहेर जाताना मास्क घालून बाहेर जावे.






