विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही' लक्षणे
निरोगी आरोग्यासाठी शरीरात विटामिन बी 12 असणे आवश्यक आहे. मात्र शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरासाठी विटामिन 12 बी अत्यंत महत्वाचे आहे. या विटामिनच्या कमतरतेमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, कमजोरी, डोकेदुखी इत्यादी शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. तसेच या विटामिन ची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होत जाते. याशिवाय हाडांमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता जाणवू लागते.आज आम्ही तुम्हाला विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सकाळी उठल्यानंतर जर शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर हे विटामिन बी 12 च्या कमतरतेचे प्रमुख कारण आहे. तसेच या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा कमी होऊन जाते आणि शरीरात थकवा अशक्तपणा जाणवतो. काम करण्याची क्षमता कमी होऊन सतत झोपून राहावेसे वाटते.
शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सकाळच्या वेळी हलकीशी चक्कर येणे किंवा सतत डोकं दुखणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. कारण या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊन जातो, ज्यामुळे सतत डोकं दुखणे, चक्कर येणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे काम करताना अनेक समस्या उद्भवू लागतात.
झोपल्यानंतर किंवा खाली बसल्यानंतर अचानक हातापायांमधून मुंग्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर घाबरून न जाता, पाय किंवा हात झटकावा. यामुळे मुंग्या कमी होतात. विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्था व्यवस्थित काम करत नाही, ज्यामुळे अंगात सुन्नपणा जाणवतो. नेहमी नेहमी थकवा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे काम करण्याची इच्छा होत नाही.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
अनेकदा सकाळी उठल्यानंतर कोणताही पदार्थ नाही. भूक कमी झाल्यामुळे वजन हळूहळू कमी होऊन जाते. विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे भूक पूर्णपणे कमी होऊन जाते. त्यामुळे शरीरात विटामिन बी 12 ची पातळी वाढेल अशा पदार्थांचे सेवन करावे.