चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ती तिच्या अभिनयासह राजकारणातील घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनवली बनली आहे. कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये चांदीचा ग्लास हातामध्ये धरताना दिसून आली आहे. तिच्या मुलाखती सोशल मीडियावर चांगल्या गाजल्या आहेत. याशिवाय कंगना चांदीच्या ग्लासातून नियमित पाणी पिते. तिला चांदीचा ग्लास तिच्या मावशींकडून भेट देण्यात आला आहे. याशिवाय कंगना एवढ्या महाग ग्लासातून पाणी पिते, असे म्हणत नेटकाऱ्यानी तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. पण चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. चांदी हा धातू शरीराला शक्ती देण्याचे काम करतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चांदीच्या ग्लासात पाणी प्याल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. सतत चिंता, तणाव, कामात लक्ष न लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी चांदीच्या ग्लास पाणी प्यावे. चांदीच्या ग्लास पाणी प्यायल्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याशिवाय जास्त राग येणाऱ्या व्यक्तींना चांदीच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डोळ्यांसंबंधित अनेक समस्या दूर होतात.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पण उपाशी पोटी नियमित चांदीच्या ग्लासातील पाणी प्याल्यामुळे शरीरात विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि अतिरिक्त चरबी कमी होईल. चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी होऊन जाते.
थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला किंवा इतर साथीचे आजार वाढू लागतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी तुम्ही चांदीच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारून शरीरात ऊर्जा निर्माण होईल. रात्री झोपण्याआधी चांदीच्या ग्लास पाणी ठेवून नंतर सकाळी उठल्यानंतर चांदीच्या ग्लासातील पाणी प्यावे. यामुळे सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवणार नाही.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
चांदीच्या भांड्यातील पाणी पिण्यास वापरल्यामुळे शरीरात निर्माण झालेला अशक्तपणा कमी होऊन आराम मिळतो. थकवा, सतत चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर चांदीच्या भांड्यातील पाणी प्यावे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.