लॅक्टोज् इनटॉलरन्स ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे
मुलाच्या एकूण आरोग्याच्या बाबतीत आतडे महत्त्वाची भूमिका बजावतात. दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते जे लहान आतड्यात तयार होते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार न झाल्यास दूध पचत नाही व ते मोठ्या आतड्यात जाते आणि तिथेच कुजू लागते. यामुळेच अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. वैद्यकीय भाषेत याला लॅक्टोजन इनटॉलरन्स म्हणतात.
दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते, जी शरीर शोषून घेते व त्याचे ग्लूकोजमध्ये रुपांतर करते व शरीराला ताकद मिळते. या प्रकारची शर्करा केवळ दुधामध्येच आढळते. डॉ. अतुल पालवे, बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.
नक्की काय असते स्थिती
दुग्धशर्करा म्हणजेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी साखर पूर्णपणे पचवता येत नाही. ही साखर पचण्यास असमर्थता दर्शवणारी एक आरोग्याची स्थिती आहे. जेव्हा लॅक्टोज योग्यरित्या पचत नाही, तेव्हा त्याची विविध लक्षणे शरीरामध्ये दिसू शकतात. लॅक्टोज् इनटॉलरन्सची लक्षणे सामान्यत: लॅक्टोज-युक्त पदार्थ किंवा पेये खाल्ल्यानंतर काही तासांत दिसून येतात. ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे आणि ती अनुवंशिक, वयानुसार बदलणारी किंवा संसर्गजन्य आजारांमुळे लहान आतड्याला झालेल्या नुकसानामुळे प्रभावित होऊ शकते.
मुलांमध्ये पचनाचे विकार
लॅक्टोजन इनटॉलरन्स ही एक चिंताजनक समस्या आहे जी वेळेवर सोडवली पाहिजे, परंतु मोठ्या संख्येने मुलांना इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), सेलिआक रोग किंवा फुड ऍलर्जी यासारख्या इतर पचन विकारांना तोंड द्यावे लागते. आयबीएस असलेल्या मुलांना ओटीपोटात दुखणे आणि अनियमित आतड्याची हालचाल होते, तर सेलिआक डिसीज ग्लूटेनच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेमुळे होतो आणि एखाद्याच्या लहान आतड्यावर परिणाम करू शकतो.
फूड अॅलर्जीमुळे अन्नातील विशिष्ट प्रथिनांना रोगप्रतिकारक शक्ती प्रतिक्रिया करते ज्यामुळे पुरळ उठण्यासारख्या लक्षणे आढळून येतात. या विकारांची लक्षणांमध्ये ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि पोटफुगी अशी असतात ज्यामुळे निदान आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे ठरते. म्हणूनच, वेळेवर उपचार करण्यासाठी मुलांना डॉक्टरांकडून योग्य मूल्यांकनाची आवश्यकता भासते. मुलांमध्ये आतड्याच्या समस्या वेळेवर सोडवल्या पाहिजेत.
मुलांमध्ये आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी टिप्स
रात्रभर पाण्यात भिजवा मेथी-धण्याच्या बिया, 21 दिवसात कोलेस्ट्रॉल नसांतून खेचून काढेल आयुर्वेदिक उपाय
संतुलित आहाराची गरज
प्रतिबंधात्मक उपायांमध्ये निरोगी आतड्याच्या सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन देण्यासाठी फळे, भाज्या आणि तृणधान्य समृद्ध संतुलित आहाराची निवड करा. पचन समस्यांचा धोका असलेल्या मुलांसाठी, नियमित तपासणी वेळीच निदान आणि उपचारास मदत करू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणताही विलंब न करता त्यांच्या आतड्याच्या आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.