
सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी प्या संत्र्याचा रस, शरीरासह त्वचेला होणारे फायदे वाचून व्हाल थक्क
संत्र्याचा ज्यूस पिण्याचे फायदे?
चहाच्या सेवनामुळे शरीराला होणारे तोटे?
संत्र्याचा ज्यूस कोणत्या वेळी प्यावा?
दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने होण्यासाठी सर्वच चहा पितात. चहा प्यायल्यामुळे झोप उडून जाते आणि खूप जास्त फ्रेश वाटते. काहींना दिवसभरात ५ ते ६ वेळा चहा पिण्याची सवय असते. पण सतत चहाचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा प्यायल्यास अपचन किंवा ऍसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे संपूर्ण दिवस खराब जातो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी संत्र्याचा ज्यूस प्यावा. संत्र्याचा रस प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. महिनाभर नियमित सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी संत्र्याचा रस प्यायल्यास शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि तुम्ही कायमच हेल्दी राहाल. संत्र्याच्या रसात असलेल्या गुणकारी घटकांमुळे केवळ शरीरालाच नाहीतर त्वचा आणि केसांनासुद्धा खूप जास्त फायदे होतात. चला तर जाणून घेऊया संत्र्याचा ज्यूस पिण्याचे फायदे.
सकाळी उठल्यानंतर सतत चहा पिण्याऐवजी संत्र्याचा रस प्यावा. संत्र्याचा रस प्यायल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक त्वचेवर चमकदार ग्लो आणतात. संत्र्याच्या ज्यूसमध्ये फायबर आणि नैसर्गिक आम्ल ज्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. वारंवार पचनाच्या समस्या उद्भवत असतील तर संत्र्याचा ज्यूस प्यावा. संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, फॉलेट आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो.
चहामध्ये असलेले कॅफीन आणि टॅनिन शरीरासाठी हानिकारक मानले जाते. सतत चहा प्यायल्यामुळे तरुण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा कोरडी पडणे, पिंपल्स इत्यादी बऱ्याच लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे चहा कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करण्याऐवजी फळांचा रस नियमित प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते. संत्र्याच्या रसात असलेले विटामिन सी आणि इतर घटक त्वचेमध्ये कोलेजन निर्मिती करण्यास मदत करतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी इतर कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्स पिण्याऐवजी संत्र्याचा रस प्यावा.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा प्यायल्यानंतर आंबट ढेकर किंवा अपचन होण्याची जास्त शक्यता असते. ऍसिडिटी झाल्यानंतर सतत डोकेदुखी किंवा उलट्या होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी संत्र्याचा रस किंवा नारळ पाणी प्यावे. संत्र्याच्या रसात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. पण सतत संत्र्याचा रस प्यायल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित एक ग्लास एवढाच संत्र्याचा रस प्यावा. जास्त संत्र्याचा रस प्यायल्यास सर्दी खोकला होऊ शकतो.
Ans: व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Ans: सकाळी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणाआधी पिणे उत्तम.
Ans: ताजा रस अधिक पौष्टिक असतो, तर पॅकेटबंद रसात प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि अतिरिक्त साखर असू शकते, जी आरोग्यासाठी हानिकारक आहे.