दारूमुळे शरीरावर होणारे परिणाम
अल्कोहोल प्यायल्याने लिव्हरला नुकसान होते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की दारू पिण्याने 6 प्रकारच्या कर्करोगाचा धोका अर्थात अल्कोहोल कॅन्सर रिस्कदेखील वाढते. नुकतेच, अमेरिकेच्या अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्चने (एएसीआर) एक संशोधन केले, ज्यामध्ये असे आढळून आले की दारू पिण्यामुळे 6 प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
या कर्करोगांमध्ये घशाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग, यकृत आणि पोटाचा कर्करोग, अन्ननलिका कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग यांचा समावेश होतो. याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
अल्कोहोल पिण्याचे दुष्परिणाम
अल्कोहोल होण्याचे काय आहेत शरीरावर परिणाम
अल्कोहोल प्यायल्याने केवळ हँगओव्हर किंवा उलट्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. याशिवाय कर्करोगांव्यतिरिक्त मद्यपान केल्याने इतर अनेक गंभीर आरोग्य धोके होऊ शकतात, जे भविष्यात घातक ठरू शकतात. जास्त मद्यपान केल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. एवढेच नाही तर दारूमुळे नैराश्य, चिंता, निद्रानाश, यकृताला सूज येणे, फुफ्फुसातील संसर्ग यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
महिनाभर दारू सोडल्यास शरीरात होईल ‘हे’ मोठे बदल, वाचून विश्वासच बसणार नाही!
थोड्या प्रमाणात दारू पिणेही हानिकारक
कमी प्रमाणात दारू पिणेही ठरेल त्रासदायक
दारू पिण्याचे दुष्परिणाम त्वचेवरही दिसून येतात. अल्कोहोल शरीराचे निर्जलीकरण करते, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. एवढेच नाही तर डिहायड्रेशनमुळे त्वचेवर लालसरपणा येण्याची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे दारू कोणत्याही प्रकारची असली तरी ती आरोग्यासाठी हानिकारक असते. म्हणून, कमी प्रमाणात वाईन किंवा इतर कोणतेही अल्कोहोल पिणे फायदेशीर ठरेल अशी फसवणूक करू नका. कितीही दारू प्यायली तरी आरोग्याला हानीच पोहचवते.
म्हणूनच, जर तुम्ही दारू पिण्याचे शौकीन असाल किंवा त्याचे व्यसन असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा. दारू पिण्याची सवय सोडवण्यासाठी तुम्ही काही छोट्या टिप्सची मदत घेऊ शकता. या वाईट सवयीपासून मुक्त होण्यास तुम्हाला खूप मदत होईल.
‘या’ गरिब देशात पिण्यात येते सर्वाधिक दारू; वाचा… दारु पिण्यात भारताचा क्रमांक कितवा?
दारू पिण्याची सवय कशी सोडवाल
दारू पिण्याची सवय कशा पद्धतीने सोडवाल जाणून घ्या
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.