'या' गरिब देशात पिण्यात येते सर्वाधिक दारू; वाचा... दारु पिण्यात भारताचा क्रमांक कितवा?
मोल्दोव्हा या पूर्व युरोपमधील देशात जगातील सर्वात जास्त दरडोई दारूचा वापर होतो. हा देश एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग होता. युरोपमधील सर्वात गरीब देश म्हणून या देशाची सध्याची घडीला ओळख आहे. मोल्दोव्हा या देशात प्रत्येक प्रौढ व्यक्ती हा एक वर्षभरात 15 लिटरपेक्षा अधिक दारू पितो.
मोल्दोव्हाचा दरडोई जीडीपी सुमारे 4,500 डॉलर इतका आहे. जे फारच कमी आहे. मात्र, दरडोई दारूच्या वापराच्या बाबतीत हा देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पूर्व युरोपातील हा देश एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग होता. या देशाचे क्षेत्रफळ हे 33,846 चौरस किमी असून, त्याची लोकसंख्या सुमारे 25 लाख इतकी आहे. या देशातील दारूचा वार्षिक दरडोई वापर 15.2 लिटर इतका आहे. जो जगात सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
सर्वाधिक दारु पिली जाणारे देश
लिथुआनिया हा युरोपीय देश हा दरडोई दारुच्या सेवनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशातील प्रत्येक प्रौढ माणूस हा एका वर्षात 15 लिटर दारू पितो. याशिवाय झेक प्रजासत्ताकमध्ये 14.4 लिटर, सेशेल्समध्ये 13.8 लीटर, जर्मनीमध्ये 13.4 लीटर, नायजेरियामध्ये 13.4 लीटर, लॅटव्हियामध्ये 12.9 लीटर, बल्गेरियामध्ये 12.7 लीटर, फ्रान्समध्ये 12.6 लिटर आणि पोर्तुगालमध्ये 12.3 लीटर वार्षिक दरडोई दारुचा वापर होतो. यानंतर बेल्जियम, रशिया, ऑस्ट्रिया, एस्टोनिया, पोलंड, स्वित्झर्लंड, यूके, उरुग्वे, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ग्रीस, दक्षिण कोरिया आणि स्पेन यांचा क्रमांक लागतो. या देशांमध्ये दारूचा दरडोई वार्षिक वापर 10 लिटरपेक्षा अधिक आहे.
Pure alcohol consumption (litres) per adult 15 years of age and over per year:
🇲🇩 Moldova: 15.2
🇱🇹 Lithuania: 15.0
🇨🇿 Czechia: 14.4
🇸🇨 Seychelles: 13.8
🇩🇪 Germany: 13.4
🇳🇬 Nigeria: 13.4
🇮🇪 Ireland: 13.0
🇱🇻 Latvia: 12.9
🇧🇬 Bulgaria: 12.7
🇫🇷 France: 12.6
🇵🇹 Portugal: 12.3
🇧🇪…— World of Statistics (@stats_feed) September 23, 2024
काय आहे भारतातील परिस्थिती
अर्जेंटिना, यूएसए, चिली, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, आइसलँड, कॅनडा, नेदरलँड्स, युक्रेन, थायलंड, जपान, ब्राझील, कझाकिस्तान, इटली, नॉर्वे, चीन, कंबोडिया, फिलीपिन्स, मेक्सिको आणि कोलंबिया या देशांमध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्ती सरासरी अधिक प्रमाणात वापरतो. या देशांमध्ये दरवर्षी दरडोई पाच लिटरपेक्षा जास्त दारु पिली जाते.
भारतात दरडोई वार्षिक ५.७ लिटर दारू पिली जाते. इस्लामिक देश या यादीत तळाशी आहेत. कुवेतमध्ये दारू पिण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. सौदी अरेबियामध्ये दरडोई दारूचा वार्षिक वापर ०.२ लिटर आहे. तर पाकिस्तानमध्ये ०.३ लिटर आहे. इजिप्तमध्ये ०.४ लीटर, नायजरमध्ये ०.५ लीटर, इंडोनेशियामध्ये ०.८ लीटर, इराणमध्ये १ लीटर, तुर्कीमध्ये २ लीटर, सिंगापूरमध्ये २ लीटर इतका दारुचा वापर होतो.