रात्री कायमच उशिरा झोपता? 'या' चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराचे होईल गंभीर नुकसान
रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय कायमचं शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे’ असे कायमच म्हंटले होते. आयुर्वेदाममध्ये झोपेविषयी अनेक महत्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे शरीराला कायमच हानी पोहचते. जंक फूड, अपुरी झोप इत्यादीमध्ये बदल झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कायमच रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे. मोबाइलवर स्क्रोलिंग करणे, टीव्ही मालिका पाहणे, अभ्यास किंवा ऑफीसचे काम पूर्ण मोबाइलवर स्क्रोलिंग करणे, टीव्ही मालिका पाहणे, अभ्यास किंवा ऑफीसचे काम पूर्ण करत बसणे इत्यादीमध्ये लोक रात्री व्यवस्थित झोप घेत नाहीत. याशिवाय शरीरात वाढलेल्या मानसिक तणावाचा परिणाम झोपेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे शांत आणि आरामदायी झोप घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात निर्माण झालेली झोपेची कमतरता शारीरिक आणि मानसिक आजार वाढण्यास कारणीभूत ठरते. ७ ते ८ तासांची शांत झोप न घेतल्यामुळे अपचन, ऍसिडिटी किंवा पोटात गॅस वाढतो. यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. रात्री वेळेवर न झोपल्यामुळे शरीराचा सर्केडियन रिदम बिघडते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. रात्रीची झोप ही केवळ विश्रांती नसून शरीराची दुरुस्ती आहे. रात्री शांत झोप घेतल्यामुळे मेंदूची दुरुस्ती होते आणि तणाव कमी होऊन आरोग्य सुधारते. शरीराचे कार्य योग्यरीत्या चालू ठेवण्यासाठी मेंदूला काही प्रक्रिया कराव्या लागतात. पण झोप पूर्ण न झाल्यामुळे या प्रक्रिया बिघडतात आणि झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते.
झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर थकवा, डोकेदुखी, लक्ष केंद्रित न होणे आणि चिडचिडेपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय झोपेच्या अभावामुळे ‘कॉर्टिसोल’ या हार्मोनचे प्रमाण वाढू लागते आणि शरीरात चिंता, मानसिक तणाव वाढून संपूर्ण आरोग्य बिघडते. त्यामुळे दिवसभरातील तणाव दूर करण्यासाठी मानसिक त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी शांत झोप घेणे आवश्यक आहे. रात्री चुकीच्या वेळी झोपल्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढू लागते, ज्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर अचानक वजन वाढणे, पोटाभोवती चरबी साचणे व मधुमेहाचा धोका, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात.
झोपेच्या कमतरतेमुळे त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. त्वचा निस्तेज होऊन डोळ्यांभोवती काळे डाग वाढू लागतात. डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या डागांमुळे कितीही फ्रेश राहिल्यास चेहरा कायमच थकल्यासारखा वाटू लागतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. हे काळे डाग लवकर कमी होत नाहीत. त्यामुळे मेंदूला आराम देण्यासाठी ७ ते ८ तासांची शांत आणि आरामदायी झोप घ्यावी. रात्री १० ते ६ ची झोप शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.
हिवाळ्यात ‘या’ पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका! आरोग्याचे वाजवाल तीन-तेरा
उत्तम झोप घेतल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि शरीराची हालचाल निरोगी राहतात. त्यामुळे रात्री उशिरा झोपण्याची सवय मोडावी. तसेच रात्री उशिरा झोपण्याची सवय मोडावी. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी चांगली आणि शांत झोप घ्यावी. ८ तासांची शांत झोप घेतल्यामुळे त्वचा, केस आणि संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात.