Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवण न सोडता अमृता खानविलकरने ‘या’ सोप्या ट्रीकने केले वजन कमी, फिटनेस पाहून बसेल आश्चर्यकारक धक्का

अभिनेत्री अमृता खानविलकरने जेवण बंद न करता वाढलेले वजन कमी केले. त्यासाठी तिने आहारात भरपूर पाणी, ग्रीन ज्यूस, साखर पूर्णपणे बंद केली होती. जाणून घ्या अमृता खानविलकरचे फिटनेस सीक्रेट.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 06, 2025 | 08:40 AM
जेवण न सोडता अमृता खानविलकरने 'या' सोप्या ट्रीकने केले वजन कमी

जेवण न सोडता अमृता खानविलकरने 'या' सोप्या ट्रीकने केले वजन कमी

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. अमृता कायमच तिच्या अभिनय, फिटनेस आणि सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते. तिने केवळ अभिनयामुळेच नाहीतर फिटनेस आणि जीवनशैलीने साऱ्यांचं आकर्षित केले आहे. अमृता खानविलकराचा चंद्रमुखी मराठी सिनेमा खूप गाजला होता. अमृता तिच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलद्वारे चात्यांसोबतच सतत काहींना काही शेअर करत असते. कधी मेकअप तर कधी स्किन केअर रुटीन, डाएट टीप शेअर करत असते. काही दिवसांआधी अमृताने तिच्या युट्यूब चॅनेलवर PCOD नंतरदिनचर्येत केलेले बदल, उपवास करण्याचे फायदे? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. शरीराचे शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी वेळेवर जेवण, योग किंवा ध्यान करणे किती आवश्यक आहे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य: Pinterest)

फुफ्फुसांमधील सर्व घाण-चिकट कफ लगेच बाहेर पडेल; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या या 5 जालीम उपायांचा वापर करा

पाणी पिण्याचे फायदे:

अमृताने सांगितल्यानुसार, नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. पाण्याच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो, त्वचा उजळदार दिसते. चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत, किडनी लिव्हरचे कार्य निरोगी राहते, रक्तभिसरण सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात.

उपाशी पोटी ग्रीन ज्यूस:

सकाळी उठल्यानंतर काहींना चहा पिण्याची सवय असते, तर काहींना कॉफी पिण्याची सवय असते. पण चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी ग्रीन ज्यूस प्यावा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ग्रीन ज्युस बनवण्यासाठी ​काकडी, सेलेरी, पालक, हिरवे सफरचंद आणि आल्याचा बारीक तुकडा इत्यादी साहित्य वापरून तुम्ही झटपट ग्रीन ज्यूस बनवू शकता. कच्च्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित ग्रीन ज्यूस प्यायल्यास पचनक्रिया सुधरण्यास मदत होईल.

जेवणानंतरचं हॉट ड्रिंक:

जेवल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी गरम पाण्यात जिरं आणि बडीशेपचे पावडर मिक्स करून प्यावी. या पाण्याच्या सेवनामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. बडीशेप खाल्ल्यामुळे तोंडातील दुर्गंधीपासून आराम मिळतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिरं आणि बडीशेपचे पाणी प्रभावी ठरेल.

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

साखर न घालता ब्लॅक कॉफी:

वाढलेले वजन कमी करताना आहारात अजिबात साखरेचे सेवन करू नये. साखर खाल्ल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. ब्लॅक कॉफी शरीरासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये चांगले फॅट्स असतात. यासोबतच अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे मूड सुधारतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Amruta khanwilkar lost weight with this simple trick without skipping food you will get a surprising shock after seeing the fitness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • fitness secret
  • Weight loss

संबंधित बातम्या

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन, झपाट्याने कमी होईल चरबी
1

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन, झपाट्याने कमी होईल चरबी

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
2

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
3

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी
4

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.