किशोरवयीन मुलांमध्ये संधीवात का वाढतोय (फोटो सौजन्य - iStock)
वृद्ध लोकांना सांधेदुखी होते हे सामान्य आहे. परंतु, जेव्हा मुलांना सांधेदुखी होऊ लागते तेव्हा ते धक्कादायक आणि चिंताजनक असते. किशोरवयीन मुलांचा संधिवात (JA) हे वयाची १६ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मुलांमध्ये उद्भवणाऱ्या ऑटोइम्यून आणि इन्फ्लेमेटरी स्थितींना दिलेले नाव आहे. यामुळे सूज येते, शरीर कडक होते, थकवा येतो आणि सांध्यामध्ये सतत वेदना होतात.
मुलांना खूप जास्त थकवा येऊ शकतो आणि या लक्षणांमुळे त्यांना त्यांची रोजची कामे करण्यात अडचणी येऊ शकतात. डॉ. मनीष सोनटक्के, कन्सल्टन्ट मिनिमली इनव्हेसिव्ह नी रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट, स्पाइन सर्जन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती आहे (फोटो सौजन्य – iStock)
किशोरवयीन मुलांचा संधिवात म्हणजे काय?
किशोरवयीन मुलांच्या संधिवाताला एकच आजार म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले नाही. उलट, हा मुलांना होणाऱ्या विविध प्रकारच्या संधिवातांचा समूह आहे. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ज्युवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस (JIA), जो माहिती असलेल्या कोणत्याही कारणांशी संबंधित नाही. ज्युवेनाईल आर्थरायटिसमध्ये रोगप्रतिकारक शक्तीमुळे अनेकदा समस्या निर्माण होतात, चुकून निरोगी ऊतींवर, विशेषतः सांध्यांवर हल्ला होतो ज्यामुळे जळजळ आणि नुकसान होते.
मुलांमध्ये संधिवात लवकर सुरू होण्याची कारणे, घ्या जाणून
लक्षणे लवकर ओळखा
मुलांमध्ये लक्षणे अचूकपणे ओळखणे जास्त कठीण असू शकते कारण मुले स्वतःला पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत, म्हणूनच पालक म्हणून, तुम्ही पुढील लक्षणांकडे लक्ष ठेवले पाहिजे:
ही लक्षणे सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून असली तर ही चिंतेची बाब आहे असे समजावे आणि तातडीने मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
समस्या लवकरात लवकर ओळखणे का महत्त्वाचे आहे
समस्या लवकर ओळखल्या न गेल्यास सांध्यांचे नुकसान वाढू शकते, त्यांच्यामध्ये बिघाड होऊ शकतो आणि बरे होऊ शकणार नाही असे अपंगत्व येऊ शकते. योग्य औषधे आणि थेरपीने, जळजळीवर उपचार केले जाऊ शकतात आणि सांध्यांचे काम टिकवून ठेवले जाऊ शकते. यामुळे त्या मुलाच्या वाढीचे आणि विकासात्मक टप्पे व्यवस्थित पार पडण्यास मदत करते.
कारणे आणि धोका उत्पन्न करणारे घटक
किशोरवयीन मुलांमध्ये संधिवात होण्याची नेमकी कारणे अजूनही अस्पष्ट आहेत, तरी काही जण पर्यावरणीय आणि आनुवंशिक घटकांमुळे हा आजार होऊ शकतो असे सुचवतात. किशोरवयीन मुलांमध्ये संधिवात हा आघात, संसर्गाचा परिणाम नाही आणि तो एकाकडून दुसऱ्याकडे पसरू शकत नाही. हा आजार पुरुषांपेक्षा महिलांना जास्त होतो.
5 पदार्थ खाऊन करा आर्थरायटीसचा धोका कमी, हाडांसाठी ठरेल वरदान
उपचार आणि व्यवस्थापन
किशोरवयीन मुलांना होणारा संधिवात बरा होत नाही असे जरी असले तरी, तातडीने उपचार केल्यास अनेक मुलांचा त्रास थोडा कमी होऊ शकतो.
पालक काय करू शकतात
अनेक लोकांना किशोरवयीन मुलांना होणाऱ्या संधिवाताबद्दल फारशी माहिती नाही, परंतु ही स्थिती खूपच वास्तविक आणि सामान्य आहे. तातडीने केले जाणारे निदान आणि योग्य उपचारांसह पालकांच्या समर्पित पाठिंब्याने, मुले आनंदाने जगू शकतात. जागरूकता वाढवणे हे उपचारांच्या दिशेने पहिले पाऊल आहे. कोणत्याही मुलाला त्रास होऊ नये यासाठी आपण या किशोरवयीन मुलांच्या संधिवाताविषयी जागरूकता महिन्यामध्ये जागरूकता जास्तीत जास्त वाढवू या.