Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता आयुर्वेदिक पद्धतीने रोखता येणार गर्भधारणा; ‘या’ मराठमोळ्या डॉक्टरने केलं संशोधन

गर्भनिरोधकासारख्या (Pregnancy) गंभीर विषयावर आयुर्वेदाचा म्हणावा तसा वापर होत नाही. किंबहुना त्यासाठी शासनाची परवानगीदेखील नाही. लवकरच आता आपल्या देशात गर्भधारणा टाळण्यासाठी हर्बल औषधांचा (Herbal Medicines) वापर होताना दिसू शकतो. महाराष्ट्रातील एका आयुर्वेदिक डॉक्टरने तयार केलेलं आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध लवकरच बाजारात येणार आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 11, 2022 | 10:52 AM
आता आयुर्वेदिक पद्धतीने रोखता येणार गर्भधारणा; ‘या’ मराठमोळ्या डॉक्टरने केलं संशोधन
Follow Us
Close
Follow Us:

आयुर्वेद हे जगभरातील अनेक आजारांवर काहीना काही समाधान हे देतंच आलेलं आहे. सध्याच्या काळात आयुर्वेदाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आरोग्याच्या अनेक लहान-मोठ्या समस्यांवर आपण घरच्या घरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा उपचार म्हणून आयुर्वेदात (Ayurveda) सांगितलेल्या वनस्पतींचा वापरदेखील करतो. विविध केमिकल्सचा (Chemicals) समावेश असलेल्या गोळ्यांचे (Tablets) साइड इफेक्ट्स (Side Effects) टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतींना (Ayurvedic Treatment Methods) प्राधान्य दिलं जात आहे; मात्र अद्यापही गर्भनिरोधकासारख्या (Pregnancy) गंभीर विषयावर आयुर्वेदाचा म्हणावा तसा वापर होत नाही. किंबहुना त्यासाठी शासनाची परवानगीदेखील नाही. लवकरच आता आपल्या देशात गर्भधारणा टाळण्यासाठी हर्बल औषधांचा (Herbal Medicines) वापर होताना दिसू शकतो. महाराष्ट्रातील एका आयुर्वेदिक डॉक्टरने तयार केलेलं आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध लवकरच बाजारात येणार आहे.

महाराष्ट्रात सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. आशा भाऊसाहेब कदम – सावंत (Dr. Asha Bhausaheb Kadam-Sawant) यांना भारत सरकारकडून गर्भनिरोधकाच्या हर्बल फॉर्म्युलाचं पेटंट (Patent) मिळालं आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ रिचर्सनंतर, 18 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना हे पेटंट मिळवण्यात यश आलं आहे. डॉ. कदम एका विश्वासार्ह औषध कंपनीच्या सहकार्यानं हे औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यांचं हे औषध टॅब्लेट (Tablets) आणि लिक्विड (Liquids) अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध होणार आहे.

आयुर्वेदिक पद्धतीनं कुटुंब नियोजन करण्याच्या दृष्टीनं हे मोठं यश मानलं जात आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या कर्जतमधल्या दादा पाटील महाविद्यालयात (Dada Patil College) सहायक प्राध्यापिका असलेल्या डॉ. आशा भाऊसाहेब कदम (सावंत) यांनी यासाठी फॉर्म्युला तयार केला आहे. त्यांचे आतापर्यंत 21 शोधनिबंध (Research Paper) प्रकाशित झाले आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी आतापर्यंतचा हा सर्वांत अचूक हर्बल फॉर्म्युला मानला जात आहे.

डॉ. कदम यांनी सांगितलं, की त्यांनी तयार केलेल्या फॉर्म्युल्याची वैज्ञानिक निकषांनुसार चाचणी केली गेली आहे. या औषधाची उंदरांवर चाचणी करण्यात आली, तेव्हा त्याला 100 टक्के यश मिळालं. यानंतर, महिलांवरदेखील या औषधाची चाचणी करण्यात आली. महिलांमध्येसुद्धा या औषधाचा सक्सेस रेट अतिशय चांगला आहे.

झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार डॉ. कदम यांनी सांगितलं, औषधाचा फॉर्म्युला 100 टक्के आयुर्वेदिक आहे. झाडांची पानं, साल, बिया इत्यादींच्या मिश्रणाचा तपशीलवार अभ्यास करून हे औषध तयार करण्यात आलं आहे. त्यामध्ये काही औषधी वनस्पतींच्या अर्कांचाही वापर करण्यात आला आहे. अनेक आदिवासी महिलांना या वनस्पतींची माहिती आहे आणि त्या त्यांचा वापरही करतात. औषध तयार झाल्यानंतर ते केंद्र सरकारच्या पुण्यातल्या नॅशनल टॉक्सिकॉलॉजी सेंटरकडे (National Toxicology Center) मंजुरीसाठी सादर करण्यात आलं. विविध तपासण्या आणि चौकशीअंती या हर्बल गर्भनिरोधक औषधाला (Herbal Contraceptive Medicines) मान्यता देण्यात आली आहे.

हे औषध आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केलेलं असल्यामुळे याचा महिलांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. गर्भधारणा टाळण्यासाठी दिवसातून एकदा हे औषध घ्यावं लागेल. अशा प्रकारे महिन्यातले 21 दिवस नियमितपणे या औषधाचं सेवन करावं लागेल.

Web Title: Ayurvedic contraceptive to avoid pregnancy formula invented by doctor asha kadam sawant nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2022 | 09:52 AM

Topics:  

  • ayurvedic tips
  • daily health tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम
1

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या
2

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट
3

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
4

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.