white-things-are-increase-bad-cholesterol-in-body-6
ब्रिटीश हेल्थ फाऊंडेशननुसार, शरारीमध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यानंतर हातापायवर सूज येणे, डोळ्यांच्या किनाऱ्यावर पिवळा थर जणे, डोळ्यांमध्ये सफेद घेराव दिसू लागणे अशा गोष्टी घडू लागतात. शरीरामध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढणे हे नेहमीच धोकादायक मानले जाते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आणि अनेक अभ्यासातूनही सांगण्यात आल्यानुसार कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक, पक्षाघात यासारख्या समस्या निर्माण होतात आणि याचा परिणाम सध्या तरूण पिढीवरही दिसून येत आहे.
मात्र योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या आयुर्वेदिक उपायानुसार, आपल्या रोजच्या आहारातील अशी एक भाजी आहे, ज्याचा ज्युस तुमच्या शरीरातील LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. नक्की ही कोणती भाजी आहे आणि त्याचा कसा परिणाम होतो हे आपण या लेखातून जाणून घेऊया. तर इतरही अनेक घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
अनुलोम – विलोम
रामदेव बाबांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगितले आहेत. यासाठी त्यांनी अनुलोम-विलोम करण्याचा सल्ला दिला आहे. अनुलोम-विलोम करण्याचा नेहमीच योगगुरू सल्ला देतात. यामुळे तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो.
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की अनुलोम विलोमचा सराव केल्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब, संधिवात, मायग्रेन वेदना, तीव्र नैराश्य इत्यादीसारख्या गंभीर आरोग्य समस्यांपासून आराम मिळतो. अनुलोम विलोमचा दररोज योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.
[read_also content=”नसांमध्ये साचलेल्या कोलेस्ट्रॉलने जाईल जीव, वेळीच करा २ पदार्थांचा समावेश https://www.navarashtra.com/lifestyle/foods-for-bad-cholesterol-flax-seeds-and-cinnamon-eat-daily-to-reduce-ldl-540880/”]
दुधीचा रस नियमित प्यावा
रामदेव बाबांनी उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांना अनुलोम-विलोमच्या नियमित सरावासह रोज १ ग्लास दुधीचा रस पिण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही दुधीचा रस घरी तयार करून पिऊ शकता. दुधीमध्ये असलेले गुणधर्म LDL कोलेस्ट्रॉल, फॅट आणि लिपिड प्रोटीनचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम करतात.
दुधीचा ज्युस कसा बनवायचा
[read_also content=”वयानुसार किती हवे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण https://www.navarashtra.com/lifestyle/what-should-my-cholesterol-level-be-age-539149/”]
दुधीच्या भाजीचे फायदे
दुधीमध्ये विटामिन बी, सी, फायबर, पोटॅशियम आणि लोह हे घटक अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे तुम्ही सकाळी रोज दुधीचा रस प्यावा असा सल्ला दिला जातो. इतकंच नाही तर दुधीच्या रसामुळे अनेक आजार तुमच्यापासून दूर राहण्यास फायदा मिळतो. याचे ज्युस नियमित प्यायल्याने डायबिटीस, कोलेस्ट्रॉल यासारखे गंभीर आजार कमी होण्यास मदत मिळते.
बाबा रामदेवांनी सांगितला उपाय