Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बैलपोळा शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारे शेअर करून साजरा करा बळीराजाचा सण

महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो. बैलपोळाच्या दिवशी घरी गोडाचे पदार्थ बनवून बैलाला नैवेद्य म्हणून खायला दिले जातात. तसेच संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो. त्यामुळे यंदाच्या बैलपोळाला बळीराजाला आणि इतरांना शुभेच्छा देण्यासाठी हे मेसेज नक्की वाचा.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2024 | 05:30 AM
बैलपोळानिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा

बैलपोळानिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा

Follow Us
Close
Follow Us:

उद्या देशभरात सगळीकडे बैलपोळा हा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये या सणाला विशेष महत्व आहे. बैलपोळाच्या दिवशी घरातील लाडक्या बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते. तसेच बैलाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. भारत हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बैलाच्या साथीशिवाय शेतकरी शेती करूच शकता नाही. कितीही आधुनिक तंत्रज्ञान आले तरीसुद्धा शेतकऱ्यांना बैलाची आवश्यकता भासतेच. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बैलपोळा हा सण साजरा केला जातो. त्यामुळे यंदाच्या बैलपोळाला व्हाट्सअप स्टेट्स आणि मेसेज द्वारे इतरांना शुभेच्छा देण्यासाठी हे काही खास संदेश नक्की वाचा.(फोटो सौजन्य-istock)

माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैलपोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!!

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

हे देखील वाचा: सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण, उपवास यांची यादी जाणून घ्या

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!

शिंगे घासली, बाशिंगे लावली,
माढुळी बांधली,म्होरकी आवरली,
तोडे चढविले, कासारा ओढला,
घुगुंरमाळा वाजे खळाखळा,
आज सण आहे बैल पोळा,
बैलपोळाच्या शुभेच्छा!

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचे देणे,
बैला, तुझा खरा सण,
शेतकऱ्या तुझा रीन,
बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!

आला बेंदूर शेंदूर,
सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,
लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!

हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024: बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी आणि कुणाकडे खाल्ला? जाणून घ्या रंजक कथा

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!

गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
बैल पोळाच्या शुभेच्छा!

डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
येगं रामाच्या बाणाचा,
तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
बैल पोळाच्या शुभेच्छा!

आज आला सण बैलाचा,
त्याच्या कौतुक सोहळ्याचा,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला,
आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Bail pola wishes in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 05:30 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.