फोटो सौजन्य- istock
आजपासून सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिना हा सण-उत्सव आणि व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात गणेशोत्सवला सुरुवात होऊन ज्येष्ठा गौरी आवाहान, पूजन आणि विसर्जन केले जाते. या महिन्यात मोदक, लाडू आणि गोडाधोडाचे जेवण असते. अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सर्व उपवास आणि सणांबद्दल जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- घरातील भिंती स्वच्छ करण्यासाठी या टिप्स वापरुन बघा
हिंदू धर्मात अनेक परंपरा, चालीरीती आणि सण आहेत. प्रत्येक महिन्यात काही खास दिवस, उपवास आणि उत्सव असतात. सप्टेंबर महिन्याची सुरुवात शेवटचा श्रावणी सोमवार, पिठोरी अमावस्या आणि बैलपोळ्याने होत आहे. भाद्रपद महिना लवकरच सुरु होत असून अनेकांना वेध लागले आहे ते गणरायाचे. तसेच या महिन्यात शिवरात्री, मंगळागौरी पूजन, शिक्षक दिन, हरतालिका, गणेशोत्सव, ऋषीपंचमी, ज्येष्ठा गौरी, दुर्गाष्टमी, एकादशी, अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, संकष्टी चतुर्थी यांसारखे सण असणार आहे. या महिन्यात कोणकोणते उत्सव आहेत ते जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- शिट्टी होताच कुकरमधून डाळ आणि तांदळाचे पाणी बाहेर येते का? ही चूक करू नका
सप्टेंबर महिन्यातील सणांची यादी
1 सप्टेंबर रविवार मासिक शिवरात्र
2 सप्टेंबर सोमवार अमावस्या, पोळा
4 सप्टेंबर बुधवार भाद्रपद मासारंभ
6 सप्टेंबर शुक्रवार हरतालिका
7 सप्टेंबर शनिवार गणेश चतुर्थी
8 सप्टेंबर रविवार ऋषीपंचमी
10 सप्टेंबर मंगळवार ज्येष्ठ गौरी आवाहन
11 सप्टेंबर बुधवार दुर्गाष्टमी, जेष्ठागौरी पूजन
12 सप्टेंबर गुरुवार ज्येष्ठा गौरी विसर्जन
16 सप्टेंबर सोमवार ईद-ए- मिलाद
17 सप्टेंबर मंगळवार अनंत चतुर्दशी, पितृपक्ष प्रारंभ, प्रोष्ठप्रदी पोर्णिमा
18 सप्टेंबर बुधवार – प्रतिपदा श्राद्ध, खंडग्रास चंद्रग्रहण, भाद्रपद पौर्णिमा
19 सप्टेंबर गुरुवार – द्वितीया श्राद्ध
20 सप्टेंबर शुक्रवार – तृतीया श्राद्ध
21सप्टेंबर शनिवार- संकष्टी चतुर्थी, चतुर्थी श्राद्ध- भरणी श्राद्ध
22 सप्टेंबर रविवार – पंचमी श्राद्ध, षष्ठी श्राद्ध
23 सप्टेंबर सोमवार – सप्तमी श्राद्ध
24 सप्टेंबर मंगळवार – कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध
25 सप्टेंबर बुधवार – नवमी नवमी श्राद्ध,
26 सप्टेंबर गुरुवार – दशमी श्राद्घ
27 सप्टेंबर शुक्रवार – एकादशी श्राद्ध
28 सप्टेंबर शनिवार – इंदिरा एकादशी
29 सप्टेंबर रविवार- द्वादशी श्राद्ध, माघ श्राद्ध,
30 सप्टेंबर सोमवार – त्रयोदशी त्रयोदशी श्राद्ध, मासिक शिवरात्री
सप्टेंबर 2024 ग्रहांचे संक्रमण
सिंह राशीमध्ये बुधाचे संक्रमण 4 सप्टेंबर
बुध सिंह राशीमध्ये संक्रमण 14 सप्टेंबर
सूर्याचे कन्या राशीत संक्रमण 16 सप्टेंबर
तूळ राशीत शुक्राचे संक्रमण 18 सप्टेंबर
कन्या राशीत बुधाचे संक्रमण 23 सप्टेंबर