Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cinnamon:चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी ‘अशा’ पद्धतीने करा दालचिनीचा वापर,चेहरा दिसेल सुंदर

त्वचेच्या आरोग्यासाठी दालचिनी गुणकारी आहे. दालचिनीमध्ये असलेल्या अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचेवर डाग, मुरूम लवकर निघून जातात. त्वचेसाठी दालचिनीचा वापर केल्याने नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 20, 2024 | 01:22 PM
त्वचेला होणारे दालचिनीचे फायदे

त्वचेला होणारे दालचिनीचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मसाल्यांमध्ये दालचिनीचा वापर सगळीकडे केला जातो. दालचिनी हा सुगंधी आणि स्वादिष्ट मसाला आहे ज्यामुळे जेवणाची चव वाढते. यामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी गुणकारी असलेली दालचिनी त्वचेच्या आरोग्यसाठी सुद्धा तितकीच प्रभावी आहे. यामध्ये अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे त्वचा सुंदर ठेवण्यासाठी मदत करतात. दालचिनी हा मसाला बॅक्टरीयाच्या वाढीस प्रतिबंध करतो.

सर्वच ऋतूंमध्ये महिलांना त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवतात. चेहऱ्यावर मुरूम येणे, फोड येणे, पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागल्यानंतर त्वचा हळूहळू खराब होण्यास सुरुवात होते. त्वचा निस्तेज दिसू लागते. त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे घरगुती आणि बाजारातील क्रीम्स आणून लावतो. पण त्याचा फारसा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी दालचिनीचा वापर केल्याने नेमके काय फायदे होतात. याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock) 

त्वचेला होणारे दालचिनीचे फायदे:

मुरूम दूर होतात:

केसातील कोंडा किंवा मासिक पाळी दरम्यान त्वचेवर मुरूम किंवा फोड येण्यास सुरुवात होते. हे फोड आल्यावर काही दिवसानंतर निघून जातात, पण त्याचे डाग मात्र तसेच राहतात. हे डाग घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्वचेवरील हेच काळे डाग घालवण्यासाठी दालचिनीचा वापर उपयोगी ठरेल. दालचिनी नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे ,ज्याचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारतो.

चेहऱ्यावरील रंग उजळण्यास मदत:

उन्हामध्ये बाहेर गेल्यानंतर त्वचा हळूहळू काळी पडण्यास सुरुवात होते. त्वचेवरील हाच हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुरळीत होऊन खडबडीत आणि निस्तेज जिवंत होण्यास मदत होते. त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन त्वचा उजळते.

अशा पद्धतीने करा दालचिनीचा वापर:

  • दालचिनीपासून फेसपॅक तयार करण्यासाठी ३ ते ४ थेंब दालचिनीचे तेल घेऊन त्यात १ चमचा मध टाका.
  • मध व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला हा फेसपॅक लावा.
  • १५ मिनिटं ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.

दुसरी पद्धत:

  • २ ते ३ तुकडे दालचिनी घेऊन त्यांची पावडर बनवून घ्या.
  • पावडर तयार झाल्यानंतर त्यात ऑलिव्ह ऑइल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्याला लावा. १५ मिनिटं ठेवल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • या फेसपॅकमुळे डाग ,मुरूम लवकर निघून जातील.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Benefits of cinnamon for skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 01:22 PM

Topics:  

  • Skin Care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.