कढीपत्याचा चहा पिण्याचे फायदे
जेवणाला फोडणी देण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. डाळ, भाजी इत्यादी अनेक पदार्थांमध्ये कढीपत्याचा प[पानांचा वापर केला जातो. कढीपत्याच्या पानांमध्ये आरोग्याला फायदेशीर असलेले सर्व गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात कढीपत्याच्या पानांचा समावेश करावा. दक्षिण भारतामध्ये कढीपत्याच्या पानांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. चटणी, सांबर, मेदू वडा, डाळ वडा इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी कढीपत्याच्या पाने वापरली जातात. सर्वच घरांमध्ये फ्रिजमध्ये किंवा कढीपत्त्याचे पाने असतात. तसेच काही लोक घरामध्येच कढीपत्याचे झाड लावतात. हे झाड घरात असल्यामुळे कीड, डास, मच्छर घरामध्ये येत नाही.
आज पर्यंत तुम्ही ग्रीन टी, दुधाचा चहा, काळा चहा किंवा गुळाचा चहा प्याल्या असेल पण कधी कढीपत्त्याच्या पानांचा चहा प्यायला आहे का? नसेल प्यायला तर जाणून घ्या कृती. कढीपत्याच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक मॅग्नेशियम इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात, जे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी फार महत्वाचे आहेत. तसेच कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामिन सी, ए, ई, बी इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात. कढीपत्यामुळे जेवणाची चव आणखीन वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कढीपत्याचा चहा कसा बनवायचा? कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
कढीपत्याचा चहा पिण्याचे फायदे
कढीपत्त्याचा चहा बनवण्यासाठी एका टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ७ ते ८ कढीपत्याची पाने टाकून चहा व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून थंड किंवा गरम चहा प्या. कढीपत्त्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे त्वचा, केस आणि रक्तभिसरण सुधारण्यासाठी मदत करते. शरीरातील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी कढीपत्याच्या पानांचा चहा प्यावा. सकाळी उठल्यावर दुधाचा चहा पिण्याऐवजी कढीपत्याचा चहा प्यावा.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी कढीपत्याचा चहा प्यावा. कढीपत्यामध्ये असलेले गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. कढीपत्यामध्ये असलेले विटामिन सी आणि ई रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे साखरेचा चहा पिण्याऐवजी कढीपत्त्याच्या चहा प्यावा.
शरीरामध्ये कमी झालेले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कढीपत्याचा चहा प्यावा. काहीपत्यामध्ये लोह अधिक प्रमाणात आढळून येते. शरीरातील रक्ताची पातळी भरून काढण्यासाठी आहारात कढीपत्याच्या पानांचा चहा प्यावा. तसेच शरीरामध्ये असलेल्या लाल रक्तपोशी वाढवण्यासाठी कढीपत्ता खावा.
कढीपत्याचा चहा पिण्याचे फायदे
त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कढीपत्याची पाने खावीत. कढीपत्याचा चहा प्यायल्यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा कमी होतो, पिंपल्स निघून जातात, चेहरा चमकदार आणि निरोगी दिसतो. हा चहा नियमित प्यायल्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडून त्वचा उजळण्यास मदत होते.