Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरासाठी ठरेल विष! प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही गाजर बीटचा रस, जाणून घ्या फायदे आणि तोटे

गाजर बीटचा रस प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण काहींच्या आरोग्यासाठी हा अतिशय रस घातक ठरतो. रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 21, 2026 | 08:23 AM
शरीरासाठी ठरेल विष! प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही गाजर बीटचा रस

शरीरासाठी ठरेल विष! प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही गाजर बीटचा रस

Follow Us
Follow Us:

गाजर बीटचा रस पिण्याचे फायदे?
कोणत्या व्यक्तींसाठी बीटचा रस हानिकारक ठरतो?
मधुमेह असलेल्या रुग्णांनी गाजर बीटचा रस का पिऊ नये?

हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात बीट, गाजर आणि इतर पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध असतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित बीटचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराची ऊर्जा वाढवतात आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढतात. बीट, गाजराचा वापर सॅलड पासून ते अगदी जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आयुर्वेदानुसार, गाजर बीटचा रस प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. काहींच्या आरोग्यासाठी बीट गाजरचा रस अमृत ठरतो तर काहींच्या आरोग्यासाठी बीटचा रस पिणे विषासमान ठरते. हा रस प्यायल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला फायदा होईल असे नाही. त्यामुळे शरीरास पचन झाल्यास बीटचा रस प्यावा.(फोटो सौजन्य – istock)

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

बीट रस प्यायल्यामुळे केवळ शरीरातील एका अवयवाला नाहीतर संपूर्ण शरीराला भरमसाट फायदे होतात. बीटच्या गुलाबी रंगामुळे आणि पोषक घटकांमुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो आणि चेहरा अतिशय सुंदर लागतो. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित बीट गाजरचा रस प्यावा. आधुनिक विज्ञानात बीट गाजरच्या रसाला ‘नॅशनल ब्लड बूस्टर ड्रिंक’ असे मानले जाते. कारण यामध्ये बीटा-कॅरोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स, नायट्रेट आणि लोह वाढवणारे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बीटचा रस प्यायल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येईल. आज आम्ही तुम्हाला बीट गाजरचा रस प्यायल्यामुळे शरीराला नेमके फायदे आणि तोटे होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

गाजर बीटचा रस पिण्याचे फायदे:

गाजर बीटचा रस नियमित प्यायल्यास रक्ताची कमतरता भरून निघेल आणि आरोग्य सुधारेल. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन, नायट्रेट आणि फोलेट इत्यादी घटक रक्तप्रवाह सुरळीत चालू ठेवण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील विटामिन सी ची पातळी वाढवण्यासाठी बीटचा रस प्यावा. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित एक ग्लास बीटचा रस प्यावा. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.लिव्हर आणि किडनी डिटॉक्स करण्यासाठी बीट गाजरचा रस अतिशय उत्तम पर्याय आहे. यामुळे रक्तातील घाण सुद्धा बाहेर पडून जाते. त्वचा, डोळे आणि केसांसाठी गाजर खूप फायदेशीर आहे. बीटमधील अँटी-ऑक्सिडंट्स फ्री-रॅडिकल डॅमेज कमी करून त्वचेवर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

गाजर बीटचा रस पिण्याचे तोटे:

सगळ्यांसाठीच गाजर बीटचा रस फायदेशीर ठरत नाही. मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी गाजर बीटचा रस पिऊ नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. याशिवाय किडनी स्टोन सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी बीट गाजरचा रस अजिबात पिऊ नये. गर्भवती महिला आणि लो बीपी असलेल्या महिलांनी गाजर बीटचा रस पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Poison for the body carrot beet juice is not beneficial for everyones health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • carrots
  • diabetes
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
1

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
2

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.