केसांसाठी नैसर्गिक टॉनिक; एक चमचा बडिशेपचा 'असा' करा वापर
जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडिशेपचं सेवन केलं जातं. आयुर्वेदानुसार बडिशेप फक्त पचनसंस्थेचं आरोग्य सुधारतं. मात्र बडिशेपचा गुणकारी फायदे फक्त पचनसंस्थेसाठी नाही तर सौंदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात चुकीच्या आहारामुळे केसांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होतो. महिलांना होणाऱ्या अनियमित मासिकपाळीमुळे केसांच्या समस्या उद्भवताता. याला पुरुश वर्ग देखील अपवाद राहिला नाही. वाढत जाणारं प्रदुषण, जंक फुड यामुळे अकाली केस पांढरे होणं, केस गळणं या समस्य़ा पुरुषांना देखील जाणवतात. अशा वेळी पार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट करणं शक्य नसतं किंवा केल्या तरी प्रत्येकाच्या केसांना ते सूट होत नाही. म्हणून जर तुम्ही सुद्धा केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर बडिशेपचा हा उपाय तुम्ही घरी करुन पाहू शकता.
आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे केसांच्या बळकटीसाठी बडिशेप वरदान आहे. अनेकांना कोंडा झाल्याने केस निस्तेज आणि कोरडे होतात. यावर घरगुती आणि रामबाण उपाय म्हणजे बडिशेप, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. केसांच्या वाढीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी व्हिटामीन्स आणि खनिजांची गरज असते, हेच पोषक घटक बडिशेपमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. पोटॅशियम, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम यांमुळे केस बळकट होतात. अनेकदा स्त्रियांना रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनेमिया सारखे होतात त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात केस गळती होते. बडिशेप या सगळ्यावर नैसर्गिक टॉनिक असल्याप्रमाणे काम करते.
बडिशेपचं सेवन करण्याबरोबरच तुम्ही बडिशेपच्या पाण्याने केसांना मसाज करु शकता. रात्रभर एक चमचा बडिशेप पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर या पाण्याने सकाळी केसांच्या मुळाशी मसाज करा. या व्यतिरिक्त तुम्ही केस बडिशेपच्या पाण्याने देखील केल धुवू शकता.
बडिशेपचं तेल
तुम्ही बडिशेपचं तेल देखील केसांना वापरु शकता. खोबरेल तेलात चमचाभर बडिशेप एकत्र करा आणि या कोमट तेलाने केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांना मोठ्या प्रमाणातं खनिजं मिळतात. केसातील कोंडा कमी होऊन केस वाढीसाठी याचा फायदा होतो.
केस कोरडे आणि कडक झाले असतील तर तुम्ही आठवड्यातून दोनदा बडिशेपची पेस्ट टाळू लावा. 20 ते 30 मिनीटं ही पेस्ट टाळूवर ठेवा आणि त्यानंतर शाम्पू न वापरता नुसत्या पाण्याने केस धुवा. हा उपाय किमान महिनाभर केल्यास केसांच्या आरोग्यात चांगला बदल झाल्याचं लक्षात येईल, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
(टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)