लांब केसांसाठी वाटीभर दह्यात मिक्स करा 'हा' पदार्थ
सर्वच महिलांना लांब आणि घनदाट केस खूप आवडतात. केसांच्या वाढीसाठी केसांची योग्य प्रकारे निगा राखली जाते. मात्र वारंवार होणाऱ्या केस गळतीमुळे केसअतिशय पातळ आणि कोरडे होऊन जातात. याशिवाय काही वेळा केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक गळणे, केसांमध्ये सतत खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे केमिकल प्रॉडक्ट वापरतात, मात्र यामुळे केस आणखीनच खराब आणि रुक्ष होऊन जातात. केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. हल्लीच्या बदललेल्या लाईफस्टाईल, प्रदूषण, असंतुलित आहार, हार्मोन्सचे असंतुलन, चुकीच्या ब्यूटी प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींमुळे केसांची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी ‘या’ दोन घरगुती पदार्थांचा करा वापर, मानेवर येईल ग्लोइंग चमक
केसांच्या लांबलचक वाढीसाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. यामुळे केस आणखीनच मजबूत होतात. आहारात झालेल्या बदलांचा परिणाम आरोग्यासह केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केस मुळांपासून मजबूत आणि घनदाट होण्यासाठी कोणत्याही केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता केसांना सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर करा. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय अतिशय गुणकारी ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी अळशीच्या बियांचा हेअरमास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. अळशीच्या बिया केसांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस गळायचे थांबतात.
केसांना पोषण देण्यासाठी अळशीच्या बियांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी किंवा = इतर वेळी एक चमचा अळशीच्या बिया नियमित चावून खाल्ल्यास केसांना भरपूर पोषण मिळेल. याशिवाय तुमचे केस घनदाट आणि मजबूत होण्यास मदत होईल. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही दह्यामध्ये अळशीच्या बिया मिक्स करून सुद्धा खाऊ शकता. मात्र अनेकांना हा पदार्थ खाण्यास आवडत नाही. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी अळशीच्या बियांपासून तयार केलेला हेअरमास्क तुम्ही केसांवर लावू शकता.
हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात १ किंवा २ चमचा अळशीच्या बिया टाकून शिजवून घ्या. काहीवेळ मिश्रण शिजवल्यानंतर ते अतिशय घट्ट होईल. बियांना जेलसारखा अर्क तयार झाल्यानंतर गॅस बंद करून अळशीच्या बियांचा अर्क गाळून घ्या. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण केसांवर लावून काहीवेळा तसेच ठेवा. केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे अळशीच्या बियांचे मिश्रण लावून घ्या. यामुळे तुमचे केस चमकदार आणि मजबूत होतील.
अळशीच्या बिया आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तसेच दह्यात प्रोबायोटिक्स आढळून येतात, ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. अळशीच्या बिया आणि दह्याचे एकत्र सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.