उन्हाळा आल्यावर वेध लागतात ते आंबा खाण्याचे. गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया हे सण आमरस खाल्याशिवाय साजरा होऊच शकत नाही असं आंबाप्रेमींकडून कायमच सांगितलं जातं. आंबा जसा चवीला चांगला लागतो तसंच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहे. सीझनला येणारी फळं खाणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतं, असा सल्ला तज्ज्ञांकडून कायमच दिला जातो. योग्य प्रमाणात आंबा खाणं आरोग्यदायी आहे. मात्र आंब्याप्रमाणेच आंब्याची कोय देथील तितकीच फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितेय का ?
सहसा आंबा खाल्यानंतर एकतर त्याची कोय फेकली जाते किंवा जमिनीत पुरली जाते. मात्र या व्यक्तीरिक्त तुम्ही सुदृढ आरोग्यासाठी आंब्याच्या कोयीचा वापर करु शकता. आंब्याप्रमाणेच आंब्याच्या कोयमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात. कोयमध्ये व्हिटॅमिन, मिनिरल्स तसेच अँटिऑक्सिडंट्स घटक मुबलक प्रमाणात असतात.
काय आहेत कोयीचे फायदे
केसांच्या आरोग्यासाठी आंब्याची कोय वरदान आहे. रोजच्या प्रदुषणामुळे किंवा आहारातील कमरतेमुळे केस कोरडे पडणं आणि केसांत कोंडा होणं या समस्यांचं प्रमाण वाढत आहे. केसात सतत कोंडा होत असल्यास आंब्याची कोय रामबाण उपाय आहे.
काय कराल ?
आंब्याची कोय स्वच्छ धुवा आणि त्याची पेस्ट बनवा. केस धुण्याच्या काही मिनिचे आधी ही पेस्ट तुमच्या स्काप लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवून टाका. असं केल्याने केस नैसर्गिकरित्या मऊ होतील. त्याशिवाय केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही केसांसाठी महागड्या ट्रीटमेंट घेत असाल तर एकदा हा उपाय घरी करुन पाहा. आंब्याची कोयीची पेस्ट केसांना लावल्याने आवश्यक ते प्रोटीन मिळतात. जे केसांच्या वाढीसाठी आणि कोंड्याच्या समस्येवर गुणकारी असल्याचं म्हटलं जातं.
मासिकपाळीच्या समस्येवर फायदेशीर
मासिकपाळीच्या संबंधित समस्या कमी करण्याठी देखील आंब्याची कोय फायदेशीर आहे. पाळी सुरु असताना सतत ओटीपोटात दुखत असेल तर कोयीचं सेवन केल्यास आराम पडतो. मासिक पाळीव्यतिरिक्त अन्य शारीरिक त्रासावर देखील आंब्याची कोय गुणकारी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याचे घटक आंब्याच्या कोयमध्ये सर्वाधिक जास्त आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील कोय फायदेशीर आहे.
काय कराल ?
आंब्याची कोय स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर उन्हात वाळवत ठेवा. कोयचा वरचा भाग काढून टाकल्यावर आतली पांढरी बी काढून त्याची पावडर करा. ही पावडर हवा बंद डब्यात साठवून ठेवा. एक ग्लास पाण्यात एक चमचा पावडर आणि एक चमचा मध घालून प्या, असं केल्याने शारीरिक व्याधी कमी होण्यास मदत होते.