त्वचा उजळ्वण्यासाठी हा फेसपॅक नक्की वापरून पहा
ऑफिसच्या कामानिमित्त किंवा इतर कारणांमुळे महिलांना बाहेर निघावे लागते. पण बाहेर गेल्यानंतर वातावरणातील बदलांचा परिणाम लगेच चेहऱ्यावर दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. चेहऱ्यावर तेल जमा झाल्यानंतर पिंपल्स आणि मुरूम येण्यास सुरुवात होते. तसेच ऑफिसचा ताणतणाव, स्ट्रेस, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतो. चेहरा खराब झाल्यानंतर मन सुद्धा नाराज होऊन जाते. काहीवेळा कामाच्या तणावांमुळे अनेक महिला ऑफिसला जायला कंटाळा करतात.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑफिस जाण्याआधी सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फेसपॅक सांगणार आहोत. हा फेसपॅक लावल्यामुळे तुमची त्वचा आणखीन उजळदार आणि ग्लोइंग दिसते.(फोटो सौजन्य-istock)
त्वचेचे सौदंर्य वाढवण्यासाठी केमिकल युक्त फेसपॅक लावण्याऐवजी घरी तयार केलेले फेसपॅक वापरावे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि ग्लोइंग दिसते. त्वचा आणि केस निरोगी राहण्यासाठी केमिकल युक्त पदार्थांचा कमीत कमी वापर करून घरगुती पदार्थ वापरावे. घरगुती पदार्थ त्वचेसाठी हानिकारक ठरत नाहीत. त्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी, पिंपल्स आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी बेसन युक्त फेसपॅकचा वापर करा.
हे देखील वाचा: चेहऱ्यावर मुरूम आणि पिंपल्स आले आहेत? मग करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
हे देखील वाचा: चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लाल होते का?मग जळजळ कमी करण्यासाठी लावा ‘हे’ थंड पदार्थ
मक्याचे पीठ त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. मक्याच्या पिठामध्ये जीवनसत्व आणि मिनरल्स आढळून येतात. त्यामुळे फेसपॅक बनवताना मक्याचा पिठाचा वापर करू शकता. मक्याच्या पिठामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसेल. मागील अनेक वर्षांपासून महिला बेसन पीठ आणि कच्च दूध त्वचा उजळदार होण्यासाठी लावत आल्या आहेत.