Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी वयातच तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे का? किचनमध्ये दडलेल्या या 5 वस्तूंपासून घरीच बनवा नॅचरल सिरम

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेच्या समस्या वाढताना दिसत आहेत. महागड्या ब्यूटी प्रोडक्ट्सऐवजी स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक घटकांचा वापर करून घरच्या घरी सोपे आणि प्रभावी नॅचरल सिरम तयार करता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 11:31 AM
कमी वयातच तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे का? किचनमध्ये दडलेल्या या 5 वस्तूंपासून घरीच बनवा नॅचरल सिरम

कमी वयातच तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे का? किचनमध्ये दडलेल्या या 5 वस्तूंपासून घरीच बनवा नॅचरल सिरम

Follow Us
Close
Follow Us:
  • त्वचा मॉइश्चरायझ करून चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत करते.
  • त्वचेला ओलावा देऊन निस्तेजपणा कमी करण्यास उपयुक्त.
  • त्वचेला थंडावा देत कोरडेपणा आणि बारीक रेषा कमी करण्यात मदत.
आजच्या धावपळीच्या जीवनात त्वचेच्या समस्या सर्वांनाच जाणवू लागल्या आहेत. बाहेरील प्रदूषण, सूर्यप्रकाश, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयी या सर्वांमुळे आपल्या चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागतं आणि त्वचा निस्तेज होऊ लागते. आता या समस्या अधिकतर वाढत्या वयासोबत जाणवू लागतात पण जर कमी वयातच तरुणपणात तुम्हाला या समस्या जाणवत असतील तर तुम्ही वेळीच यावर घरगुती उपाय करायला हवेत. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी बाजारात बरेच ब्यूटी प्रोडक्टस उपलब्ध तर आहेत पण त्यांची किंमत ग्राहकांच्या खिशाला कात्री बसवण्यासारखी आहे.

दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे हसताना लाजिरवण्यासारखे वाटते? पांढऱ्या शुभ्र दातांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

अनेकांना ठाऊक नाही पण आपल्या स्वयंपाकघरात असणारे बहुतेक घटक हे आपल्या त्वचेवर वापरले जाऊ शकतात. हे घटक पूर्णपण नैसर्गिक असल्याने चेहऱ्यावर याचा कोणताही परिणाम होत नाही. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांपासून घरी नॅचरल सिरम कसा तयार करायचा याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. हे घरगुती सिरम नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्याला चमकदार बनवेल आणि यामुळे सुरकुत्या देखील काढून टाकणे सोपे हाईल.

मध आणि लिंबाचा वापर

मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि लिंबू त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. या दोन्ही घटकांचा एकत्रित वापर करुन तुम्ही एक नॅचरल सिरम तयार करु शकता. यासाठी एका भांड्यात सर्वप्रथम २ चमचे मध आणि १ चमचा ताजा लिंबाचा रस घाला. दोन्ही घटक चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर याचा पातळ थर लावा. २० मिनिटे याला चेहऱ्यावर तसेच राहू द्या आणि मग फेसवाॅश आणि पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे हळूहळू चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.

हळद आणि नारळ तेल

हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो आणि नारळ तेल खोलवर ओलावा प्रदान करते. यासाठी एका भांड्यात तुम्हाला १ चमचे हळद आणि दोन चमच नारळ तेल घ्यायचे आहे. दोघांना मिसळून याची एक पेस्ट तयार करा आणि नंतर ती चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून चांगला स्वच्छ करा. यामुळे निस्तेज चेहऱ्यावरील चमक वाढण्यास मदत होते.

‘अ‍ॅक्टरेक’च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा! आतापर्यंत एकूण ९०० रुग्णांवर उपचार, ४०० हून अधिक लहान मुलांचा समावेश

कोरफड आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल

कोरफड त्वचेला थंडावा आणि आराम मिळवून देते. हा सिरम तयार करण्यासाठी एक भांड्यात १ चमचा कोरफड जेल, १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल, १ चमचा गुलाबजल आणि १/२ चमचा ग्लिसरीन घाला. सर्व साहित्य मिसळून याची पेस्ट तयार करा आणि नंतर ती चेहऱ्यावर लावा. यामुळे कोरडेपणा दूर होऊन चेहऱ्यावरील बारीक रेषा नाहीशा होण्यास मदत होईल.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. कोणताही नवीन सीरम लावण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा. जर चिडचिड किंवा ऍलर्जीक प्रतिक्रिया उद्भवल्या तर वापर बंद करा. तसेच, जास्त प्रमाणात लावणे टाळा.

 

Web Title: Skin loosening at young age make natural serum at home using 5 kitchen ingredients for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle news
  • Skin Care

संबंधित बातम्या

Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देईल ‘शिकंजी’, पारंपरिक पेयाची रेसिपी जाणून घ्या
1

Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देईल ‘शिकंजी’, पारंपरिक पेयाची रेसिपी जाणून घ्या

पारंपरिक कलेचा अप्रतिम संगम! जाणून घ्या कलमकारी साडीच्या सौंदर्याची खास वैशिष्ट्य
2

पारंपरिक कलेचा अप्रतिम संगम! जाणून घ्या कलमकारी साडीच्या सौंदर्याची खास वैशिष्ट्य

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर
3

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग
4

क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.