त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय
चेहऱ्यावरील आणि शरीरावरील अतिरिक्त केस काढण्यासाठी सर्वच महिला वॅक्सिंग करतात. वॅक्सिंग केल्यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त केस निघून जातात, मात्र त्वचा खेचली जाते. शरीरावरील केस काढण्यासाठी महिलांना वॅक्सिंग करणं हा एक उत्तम पर्याय वाटतो. पण अनेकदा चुकीच्या पद्धतीने वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. खास करून चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर लालसरपणा, सूज, पिंपल्स, खाज, आणि त्वचा कोरडी पडणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. तसेच त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यावर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक महिला वॅक्सिंग करून आल्यानंतर त्वचेला काहीच लावत नाहीत. पण असे केल्यामुळे त्वचा आणखीनच बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील वॅक्सिंग केल्यामुळे कोणते पदार्थ लावावे, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय
वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहऱ्याला साबण लावू नये. साबण लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यानंतर त्वचा स्वच्छ धुवा. त्वचा पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावी. त्यानंतर त्वचेवर आलेली सूज कमी करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी बर्फ लावावा. बर्फ लावल्यामुळे त्वचा थंड राहते. तसेच वॅक्सिंग करून आल्यानंतर २४ तास चेहऱ्याला गरम पाणी लावू नका. थंड पाण्याने चेहरा धुवून झाल्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ पुसावा.
हे देखील वाचा: गणेशोत्सवात ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक, त्वचेवर येईल सुंदर चमक
त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय
वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहरा जास्त कोरडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहरा स्वच्छ करून चेहऱ्यावर मॉइस्चरायझरचा लावावे. त्वचेला मॉइस्चरायझर लावल्यामुळे आर्द्रता मिळते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तेलकट त्वचा असलेल्या महिलांनीसुद्धा चेहऱ्याला मॉइस्चरायझर लावावे. चेहऱ्यावर नेहमी हलके आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइस्चरायझर लावावे.
त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय
चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यामुळे त्वचा आतून गरम होऊन जाते. गरम झालेली त्वचा थंड करण्यासाठी काकडी किसून त्यात मध मिक्स करून त्वचेला लावा. यामुळे त्वचेतील उष्णता कमी होऊन चेहरा थंड पडेल. तसेच चेहऱ्यावर तुम्ही काकडीचे क्यूब सुद्धा लावू शकता. यासाठी काकडी किसून त्यातील पाणी काढून किंवा तशीच ठेवून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. त्यानंतर आईस क्यूब तयार झाल्यावर संपूर्ण चेहऱ्यावर चोळा. यामुळे त्वचा थंड राहील.
हे देखील वाचा: कोंड्यापासून मुक्ती मिळ्वण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, केस होतील मऊ
त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हे गुणकारी उपाय
त्वचेची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी चेहऱ्यावर कोरफड जेल लावावे. ताजे कोरफड जेल त्वचेसाठी उत्तम आहे. कोरफडच्या रसात औषधी गुणधर्म आढळून येतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जातो.