
महिन्यातून कोणत्या ५ दिवसात ठेवावे शारीरिक संबंध, होऊ शकते गर्भधारणा (फोटो सौजन्य - iStock)
बहुतेक जोडप्यांना गर्भधारणा होण्यास संघर्ष करावा लागतो कारण त्यांना प्रयत्न करण्याची योग्य वेळ माहीत नसते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा मीना गुप्ता यांनी माहिती दिल्याप्रमाणे, बहुतेक जोडप्यांना ही गोष्ट माहीत नसते आणि म्हणूनच त्यांना गर्भवती होण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
केवळ ५ दिवसाचा कालावधी
गायनॉकॉलिज्ट डॉ. मनीषा मीना गुप्ता यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत माहिती दिली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, गर्भवती होण्याची शक्यता तुम्ही किती वेळ प्रयत्न करता यावर अवलंबून असते. तुमच्याकडे महिन्यात फक्त ५ दिवस असतात जेव्हा तुम्ही गर्भवती होऊ शकता. म्हणून, या काळात तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत. तसंच गर्भवती होण्यासाठी तुम्ही योग्य माहिती आधी घेतली पाहिजे.
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
५ दिवसांची फर्टाइल विंडो
या पाच दिवसांच्या वेळेला स्त्री ची फर्टाइल विंडो म्हणतात. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की पहिल्या तीन दिवसांत तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढते आणि दुसऱ्या दिवशी २० टक्क्यांनी कमी होते. हे तुमच्या ओव्हुलेशनच्या तारखेनुसार निश्चित केले जाते. आता यासाठी तुम्हाला तुमच्या ओव्ह्युलेशनचा काळही माहीत असणे आवश्यक आहे. तो माहीत असल्यास त्वरीत तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. बाळाचा प्रयत्न करत असल्यास आधी तुम्ही ही गोष्ट आत्मसात करायला हवी आणि योग्य माहिती घेऊन आपल्या जोडीदारासह या बाबीची काळजी घ्यायला हवी. आरोग्य जपायला हवे
गर्भधारणेची सर्वाधिक शक्यता?
मायोक्लिनिकच्या मते, स्त्रीच्या अंडाशयातून अंडी बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला ओव्हुलेशन म्हणतात. सोडल्यानंतर, अंडी फक्त १२ ते २४ तास सुपीक राहते. जर तुमचे मासिक पाळी २८ दिवसांचे असेल, तर ओव्हुलेशन १४ व्या दिवसाच्या आसपास होते. डॉक्टर नेहमी तुम्हाला या दिवसांमध्येच शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देतात. कारण या काळात सहजपणाने गर्भधारणा होण्याची शक्यता असते. बरेचदा डॉक्टर पहाटेच्या वेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा सल्लाही देतात. कारण यावेळी शरीरातील हार्मोन्सची पातळी अधिक चांगली असते.
प्रेग्नंसी राहात नाहीये तर या गोष्टी प्यायला करा सुरूवात, लगेचच होईल गर्भधारणा
काय सांगतात तज्ज्ञ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.