लांब, दाट आणि काळ्या केसांसाठी वरदान आहे 'ही' आयुर्वेदिक पावडर
केसं आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहेत. अनेकदा आपल्या केसांमुळे आल्या सौंदर्यात आणखीन भर पडत असते. मात्र अनेकदा बदलत्या वातावरणामुळे केसांच्या समस्या निर्माण होत असतात. अधिकतर असे महिलांच्या बाबतीत घडत असते. केस गळती, केसांची वाढ खुंटण, केसात कोंडा निर्माण होणं अशा समस्यांनी महिलावर्ग त्रस्त होतात. सध्याच्या हवेतील प्रदुषणामुळं, तसेच, सकस आहाराचा अभावामुळं केसांवर गंभीर परिणाम होताना दिसतायात. या समस्या जरी सामान्य वाटत असल्या तरी स्त्रीच्या बाधा ठरत असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदात केसांच्या अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी अनेक उपाय उपाय सांगितलेले आहेत.
मसाल्यांपासून औषधी वनस्पतींपर्यंत, सर्व गोष्टी भारतात प्रचलित आहेत. फार पूर्वीपासून आपल्या देशात त्वचा, शरीर आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला जात आहे. आजही त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेषतः केसांसाठी यांचा वापर फार फायद्याचा ठरत असतो. बदलत्या काळानुसार, अनेक गोष्टी बदलल्याचे दिसून येत आहे. आता नैसर्गिक गोष्टींची जागा रासायनिक उत्पादनांनी घेतली आहे, त्यामुळे केसांना ना पोषण मिळत आहे ना ते मजबूत होत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला औषधी वनस्पतींचा राजा मानल्या जाणाऱ्या भृंगराजविषयी सविस्तर सांगणार आहोत. केसांशी संबंधित अनेक समस्यांवर उपाय म्हणून याचा वापर करता येऊ शकतो.
हेदेखील वाचा – किलोभर लसूण 2 मिनिटांत सोलून होईल फक्त ‘या’ भन्नाट टिप्स फॉलो करा, Video पहा आणि कमाल बघा
भृंगराज पावडर बाजारात सहज उपलब्ध होते. या पावडरमध्ये खोबरेल तेल मिसळून याची एक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट 1-2 तास केसांवर लावून ठेवा आणि यानंतर शॅम्पूने केस नीट धुवून टाका. हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. हा उपाय टाळू स्वच्छ करण्यास आणि केसांना पोषण देण्यास मदत करतो.