हिरड्यांमधून सतत रक्त- पू येतो? दात स्वच्छ करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
वाढत्या वयात आरोग्यासंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. त्वचा, केस, दात आणि संपूर्ण शरीरात होणाऱ्या बदलांमुळे काही गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. दात पिवळे झाल्यानंतर हसताना किंवा बोलताना बऱ्याचदा महिलांना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. तसेच दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. चुकीच्या सवयींमुळे हळूहळू दातांचा रंग फिका पडणे, हिरड्यांमध्ये जखमा होणे, दातांमध्ये वाढलेल्या वेदना किंवा दातांना कीड लागण्याची जास्त शक्यता असते. दात खराब झाल्यानंतर डेंटल एक्स्पर्टकडून पॉलिशिंग किंवा क्लिनिंग इत्यादी ट्रीटमेंट करून घेतल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)
दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या क्रीम किंवा इतर अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र तरीसुद्धा दात स्वच्छ होत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांवर वाढलेला पिवळेपणा आणि दातांच्या हिरड्या स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे दातांच्या सर्वच समस्या दूर होतील आणि दात पांढरेशुभ्र दिसू लागतील. चला तर जाणून घेऊया दात स्वच्छ करण्यासाठी उपाय.
दातांवर वाढलेला पिवळा थर आणि हिरड्यांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. बेकिंग सोड्यात असलेले गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिक्स करून दातांवर चोळा. हलक्या हाताने दात घासून झाल्यानंतर पाण्याच्या गुळण्या करून दात स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून तीनदा केल्यास दातांवर वाढलेला पिवळा थर कमी होऊन दात स्वच्छ होतील.
जेवणातील पदार्थ बनवताना मोहरीच्या तेलाचा आणि मिठाचा वापर केला जातो. मिठाचा वापर केल्यामुळे हिरड्यांमधून सतत येणारे रक्त थांबण्यास मदत होईल. याशिवाय तुमचे दात स्वच्छ दिसू लागतील. यासाठी वाटीमध्ये थोडस मीठ आणि मोहरीचे तेल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण हिरड्या आणि दातांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर दात ब्रशने स्वच्छ घासून घ्या. यामुळे दातांमध्ये वाढलेला पिवळा थर कमी होईल.
तोंडात वाढलेली दुर्गंधी, दातांवर वाढलेला पिवळा थर आणि दात स्वच्छ करण्यासाठी नारळ तेलाने ऑइल पुलिंग करावे. यामुळे संपूर्ण तोंड स्वच्छ होण्यास मदत होते. एक चमचा नारळाचे तेल तोंडात घेऊन १०-१५ मिनिटे हलके हलवून तोंड धुवून घ्या. त्यानंतर पाण्याने तोंड स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल आणि तुमचे दात स्वच्छ होतील.
दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय?
पिवळे दात दूर करण्यासाठी, बेकिंग सोडा, मीठ, खोबरेल तेल आणि स्ट्रॉबेरी आणि लिंबूवर्गीय फळे यांसारख्या फळांसह अनेक नैसर्गिक घरगुती उपायांचा वापर केला जाऊ शकतो.
दात पिवळे होण्याची काही प्रमुख कारणे:
जसजसे आपले वय वाढते, तसतसे दातांचे बाह्य आवरण (इनॅमल) पातळ होते आणि आतील पिवळ्या रंगाचा थर (डेंटिन) अधिक दिसू लागतो, ज्यामुळे दात पिवळे दिसू शकतात. नियमितपणे दात न घासल्यास दातांवर प्लेक आणि टार्टर जमा होऊ शकतो, ज्यामुळे पिवळे डाग दिसू शकतात.
दात पिवळे होणे कसे टाळाल:
नियमितपणे दिवसातून दोनदा दात ब्रश करा आणि दररोज फ्लॉस करा.दातांवर डाग निर्माण करणारे पदार्थ आणि पेये कमी प्रमाणात घ्या.धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळा.डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तोंडी स्वच्छता उत्पादने वापरा.