आतड्यांमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा 'या' पेयाचे सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप आणि तेलकट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शरीरात सतत होणाऱ्या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा धोका वाढू लागतो. पुरेशी झोप न झाल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. त्यामुळे अपचन, गॅस किंवा बद्धकोष्ठता वाढून आरोग्य बिघडते. बऱ्याचदा शरीरसंबंधित अतिशय लहान वाटणाऱ्या गोष्टी पुढे गंभीर स्वरूप घेतात.त्यामुळे दीर्घकाळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात डिटॉक्स पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून गेल्यामुळे आरोग्य सुधारते. याशिवाय रक्त शुद्ध होणे, पचनक्रिया सुधारते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पेयाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयाच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचलेले विषारी घटक लघवीद्वारे बाहेर पडून जातील. नियमित डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यावे. एक ग्लास पाण्यात रात्रभर धणे भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी तयार धण्याचे पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. शरीरातील विषारी घटक मूत्रावाटे बाहेर टाकण्यासाठी धणे प्रभावी ठरतात. लघवीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी धण्याचे पाणी प्यावे.
नियमित एक सफरचंद खाण्याचा डॉक्टरसुद्धा सल्ला देतात. सफरचंद खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. सफरचंद आणि दालचिनी मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लॅव्होनॉइड्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे तुम्ही सफरचंदाचे तुकडे आणि दालचिनीची काडी टाकून तयार केलेल्या पाण्याचे नियमित सेवन करू शकता.
लिंबामध्ये शरीर सुद्धा करणारे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे उपाशी पोटी कोमट पाण्यात आलं लिंबू आणि काळे मीठ टाकून तयार केलेले पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. काकडीच्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आल्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते.
Liquor pegs: दारूचे पेग ३० मिली, ६० मिली आणि ९० मिली’चेच का असतात; काय आहे यामागचं कारण?
डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय?
डिटॉक्स ड्रिंक म्हणजे फळे, भाज्या, औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी बनवलेले पाणी, ज्यामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची क्षमता असल्याचा दावा केला जातो, असे काही आरोग्य वेबसाइट्स आणि तज्ञांनी सांगितले आहे. डिटॉक्स ड्रिंक पिण्याचा मुख्य उद्देश शरीरातून विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्ध करणे आहे.
डिटॉक्स ड्रिंक कधी प्यावे?
डिटॉक्स ड्रिंक तुम्ही दिवसातून कधीही पिऊ शकता. काहीजण सकाळी रिकाम्या पोटी पिणे पसंत करतात, तर काहीजण दिवसभर थोडे थोडे पितात.
डिटॉक्स ड्रिंक पिण्याचे काही दुष्परिणाम आहेत का?
बहुतेक डिटॉक्स ड्रिंक सुरक्षित मानले जातात, परंतु काही लोकांना काही घटकांमुळे ऍलर्जी किंवा इतर समस्या येऊ शकतात. त्यामुळे, जर तुम्हाला कोणत्याही घटकाची ऍलर्जी असेल, तर ते घटक वापरणे टाळावे. तसेच, कोणताही डिटॉक्स ड्रिंक नियमितपणे पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.