
जेवण किंवा एखादा पदार्थ पाहिला किंवा त्याचा सुगंध घेतला की तोंडाला पाणी सुटतं. एखादा पदार्थ किती छान असू शकतो हे त्याच्या दिसण्यावरु अंदाज लावता येतो. कधी कधी तर एखादा पदार्थ फक्त पाहिला तरी पोटातली भूक चाळवते. म्हणजेच काय तर पदार्थाची चव चाखायच्या आधी आपण त्याला डोळ्यांनी आधी अनुभवतो. मात्र तुम्हाला जर असं सांगितलं की, डोळ्य़ावर पट्टी बांधून तुम्हाला जेवायचं आहे तर काय होईल ? खरंतर या जागात डार्क डायनिंग नावाची एक खवय्यांसाठी संकल्पना आहे ज्याला जगभरातील अनेक खवय्यांनी पसंती दिली.
पॅरिसमध्ये 1997 साली Le Gout du Noir या नावाने पहिल्यांदा डार्क डायनिंगची पद्धत सुरु झाली. याचं अमनुकरण नंतर स्वित्झर्लंड देशानं केलं. त्यानंतह हळूहळू ही संकल्पना इतर देशांनी आत्मसात केली. ब्लाइंडेकुड या नावाचं जगातील पहिलं असं रेस्टॉरंट आहे जिथे चक्क पूर्णपणे काळोख असतो. Blindekuh म्हणजे आपल्या मराठी भाषेच आंधळी कोशिंबीचा खेळ. जे डोळ्य़ाला पट्टी बांधून केवळ आवाज आणि स्पर्शाच्या इंद्रियांनी खेळला जातो. अगदी त्याचप्रमाणे ही संकल्पना खवय्यांना विविध पदार्थ चाखण्यासाठी वापरली गेली. पाहुण्यांना अंधारात नेऊन बसवले जाते आणि सर्व्हर त्यांना जेवणाचे साधन कसे वापरायचे? ग्लास आणि प्लेट कुठे आहेत? हे त्यांना समजावून सांगितलं जातं. त्यानंतर त्यांना जेवणाचा सुंगध, स्पर्श यानुसार तो पदार्थ ओळखून खायला असतो. काही ठिकाणी पाहुण्यांच्या डोळ्य़ांवर पट्टी देखील बांधली जाते.
आज डार्क डायनिंग या संकल्पनेला जागतिक पातळीवर खवय्यांकडून पसंती मिळाली . युरोपपासून सिंगापूर, व्हिएतनाम, कॅनडा आणि भारतापर्यंत अशा अनेक ठिकाणी ही संकल्पना प्रसिद्ध आहे. यामागे असं काही विशेष अर्थ तसा इतका नाही. मात्र या जगात असे काही अंध आहेत ज्यांना पदार्थ डोळ्यांनी पाहता येत नाही अशी माणसं कशी या सगळ्याला सामोरी जातात याचा अनुभव सामान्य माणसांना मिळावा. यासाठी हा सगळा खटाटोप केला जातो. हा फक्त एक गंमतीशीर खेळ नाही तर आपल्याला आपल्या इंद्रियांचा योग्य तसा वापर करता यावा म्हणून हे असं सगळं केलं जातं असं म्हटलं जातं.