Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breastfeeding Week: स्तनपान आणि बाळाची प्रतिकारशक्ती, काय आहे सत्य?

Breastfeeding Week: बाळासाठी आईचं दूध सर्वोत्तम असतं हेच सर्वांना माहीत आहे. पण बरेचदा स्तनपानामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते असं सांगण्यात येतं आणि यामागील नेमकं सत्य काय?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 06, 2026 | 08:08 PM
स्तनपान आणि बाळाच्या प्रतिकारशक्तीचा काय संबंध (फोटो सौजन्य - iStock)

स्तनपान आणि बाळाच्या प्रतिकारशक्तीचा काय संबंध (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • बाळासाठी स्तनपान का महत्त्वाचे आहे?
  • स्तनपान आणि बाळाची प्रतिकारशक्ती 
  • काय आहे यामागील सत्य, तज्ज्ञांकडून माहिती 
Breastfeeding Week: पिढ्यानपिढ्या मातांना एकच गोष्ट सांगितली जातेय, ती म्हणजे ‘बाळासाठी आईचे दूध सर्वोत्तम’. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण ही फक्त ऐकीव गोष्ट आहे की याला काही वैज्ञानिक आधारही आहे? सुदैवाने, स्तनपानाचे महत्त्व पटवून देणारे अनेक वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत; पण याचे उत्तर जितके सोपे वाटते, त्यापेक्षा ते समजून घेणे  थोडे क्लिष्ट आहे. डॉ. शिल्पा आरोसकर, हेड ऑफ डिपार्टमेंट – पीडियाट्रिक्स आणि निओनॅटोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

Breastfeeding Week: योग्य पद्धतीने स्तनपान कसे कराल?

आईच्या दुधात नेमके काय असते?

आईचे दूध हे केवळ पोषणाचे माध्यम नाही. त्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन, रोगप्रतिकारक पेशी, एन्झाईम्स आणि प्रोबायोटिक्सचे एक गुंतागुंतीचे मिश्रण असते, जे नवजात बाळाचे शरीर जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत स्वतः तयार करू शकत नाही. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘सिक्रेटरी इम्युनोग्लोब्युलिन ए’ (sIgA). हे एक प्रकारचे अँटीबॉडी आहे जे बाळाच्या आतड्यांवर आणि श्वसननलिकेवर एक सुरक्षित कवच तयार करते; ज्यामुळे जंतूंचा शरीरात प्रवेश रोखला जातो. आई जेव्हा तिच्या सभोवतालच्या वातावरणातील जंतूंच्या संपर्कात येते, तेव्हा तिची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःहून अशा अँटीबॉडीज तयार करते, ज्या बाळाचे त्याच जीवाणूंपासून रक्षण करतात.

याशिवाय, आईच्या दुधात पांढऱ्या पेशी, लॅक्टोफेरिन (जे जीवाणूंशी लढते) आणि ऑलिगोसॅकराइड्स असतात. ऑलिगोसॅकराइड्स ही एक प्रकारची क्लिष्ट साखर आहे, जी बाळ पचवू शकत नाही; पण ती बाळाच्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवण्यास मदत करते. हे सर्व घटक मिळून बाळाचे ‘मायक्रोबायोम’ म्हणजेच पोटातील आरोग्य उत्तम ठेवतात, जे वाढत्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

संशोधन काय सांगते?

अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की, स्तनपानामुळे बाळाला सुरुवातीच्या काळात होणाऱ्या जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो. श्वसनाचे त्रास, पोटाचे विकार आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमधील आतड्यांचे गंभीर आजार रोखले जाऊ शकतात. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात, फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या बाळांपेक्षा स्तनपान करणाऱ्या बाळांना दवाखान्यात नेण्याची गरज खूप कमी पडते.

स्तनपानाचे दीर्घकालीन फायदेही सांगितले जातात, जसे की दमा, ॲलर्जी, लठ्ठपणा आणि टाईप १ मधुमेह यांचा धोका कमी होणे, पण याचे पुरावे थोडे कमी आहेत आणि इतर कारणांमुळे यात फरक पडू शकतो. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही दिवसांत येणाऱ्या घट्ट, पिवळसर दुधामध्ये अँटीबॉडीज भरपूर असतात. म्हणूनच, त्याला बाळाची ‘पहिली लस’ म्हटले जाते, जे अगदी योग्य आहे.

काही महत्त्वाच्या गोष्टी

स्तनपानामुळे बाळाला उत्तम रोगप्रतिकारक शक्ती मिळते, हे नक्की. पण याचा अर्थ असा नाही की बाळ कधीच आजारी पडणार नाही. स्तनपान करणाऱ्या बाळांनाही सर्दी किंवा इतर सामान्य आजार होऊ शकतात. फरक एवढाच आहे की, त्यांना  हे आजार इतरांपेक्षा कमी वेळा आणि अगदी सौम्य प्रमाणात होतात. स्तनपानाचे रोगप्रतिकारक शक्तीसंदर्भातील हे फायदे बहुतांश तात्पुरते असतात आणि जसजसे बाळ मोठे होते, तसतसा हा प्रभाव कमी होत जातो.

आता फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या बाळांबाबत काय होते ते पाहू या. आजकालच्या फॉर्म्युला मिल्कमध्ये बाळाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच, बाळ जसजसे मोठे होते, सभोवतालच्या जंतूंच्या संपर्कात येते आणि त्याचे लसीकरण होते, तसतशी त्याची स्वतःची रोगप्रतिकारक शक्तीही तयार होऊ लागते. याशिवाय पुरेशी झोप, योग्य पोषण, आजूबाजूचे वातावरण आणि आनुवंशिकता यासारख्या इतरही अनेक गोष्टींचा प्रभाव बाळाच्या आरोग्यावर पडत असतो.

World Breastfeeding Week: बाळाच्या उत्तम आरोग्याची सुरुवात आईपासून! बाळंतपणानंतर महिलांना उत्तम पाठबळ देण्याचे पाच मार्ग

खरंच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते का? 

स्तनपानामुळे बाळाला उत्तम रोगप्रतिकारक शक्ती मिळते, यात शंकाच नाही. विशेषतः जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात अनेक सामान्य जंतुसंसर्गापासून बाळाचे रक्षण करण्यासाठी याची मोठी मदत होते. आईच्या दुधातील अँटीबॉडीज, रोगप्रतिकारक पेशी आणि इतर घटक बाळाच्या पोटाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. पण, सशक्त रोगप्रतिकारक शक्तीसाठी केवळ स्तनपान हाच एकमेव घटक नाही; प्रत्येक बाळाच्या शरीरात याची कमतरता भरून काढणारे इतरही अनेक सकारात्मक घटक असतात.

जर तुम्ही काही अपरिहार्यता, स्वतः ठरवून किंवा परिस्थितीमुळे स्तनपान करू शकत नसाल, तर चिंता  करण्याचे अजिबात कारण नाही. फॉर्म्युला मिल्क पिणारी बाळेसुद्धा स्तनपान करणाऱ्या बाळांइतकीच उत्तम रीतीने वाढू शकतात. बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही केवळ स्तनपानावर अवलंबून नसून, ती एकमेकांशी जोडलेल्या अनेक घटकांमुळे विकसित होत असते.

Web Title: Breastfeeding week truth behind breastfeed gives more immunity to newborn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • breastfeeding
  • newborn baby
  • world breastfeeding week

संबंधित बातम्या

World Breastfeeding Week: स्तनपानामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा टळू शकतो का? जाणून घ्या सत्य
1

World Breastfeeding Week: स्तनपानामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा टळू शकतो का? जाणून घ्या सत्य

World Breastfeeding Week: बाळाच्या उत्तम आरोग्याची सुरुवात आईपासून! बाळंतपणानंतर महिलांना उत्तम पाठबळ देण्याचे पाच मार्ग
2

World Breastfeeding Week: बाळाच्या उत्तम आरोग्याची सुरुवात आईपासून! बाळंतपणानंतर महिलांना उत्तम पाठबळ देण्याचे पाच मार्ग

स्तनपान करताना ‘या’ चुकीच्या समजुतींवर अजिबात ठेवू नका विश्वास; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

स्तनपान करताना ‘या’ चुकीच्या समजुतींवर अजिबात ठेवू नका विश्वास; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न
4

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.