Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीव्र उन्हात राहिल्याने होऊ शकतो मृत्यू? सावधानी घ्या, स्वतःचा बचाव करा

तीव्र उष्णतेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यात हीटस्ट्रोकसारख्या जीवघेण्या समस्या उद्भवतात. योग्य काळजी आणि सावधगिरी बाळगल्यास या धोक्यांपासून सुरक्षित राहता येते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 22, 2025 | 06:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

तीव्र उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि याचे परिणाम केवळ अस्वस्थतेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर गंभीर आरोग्य धोक्यांमध्येही रूपांतर होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक भागांत लूचा म्हणजेच गरम वाऱ्यांचा जोर असतो. या वाऱ्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर गेले की ‘हीटस्ट्रोक’ होण्याची शक्यता वाढते. हे घातक स्थिती असून, मेंदू, हृदय यांसारख्या अत्यावश्यक अवयवांवर ताण येतो आणि यामुळे मृत्यूही होऊ शकतो. विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले आणि जे आधीपासून काही आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी उष्णता अधिक घातक ठरते.

Walking Benefits: काय आहे 6-6-6 वॉकिंगची नवी पद्धत? 1 महिन्यात झर्रकन वजनाचा काटा येईल खाली; हृदयही राहील फिट

उन्हामुळे शरीरातून भरपूर घामाच्या स्वरूपात पाणी आणि क्षार बाहेर पडतात. त्यामुळे शरीरात पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते. यामुळे चक्कर येणे, मळमळ, उलटी होणे आणि बेशुद्ध होणे असे लक्षणे दिसतात. शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेत गेले तर उपचाराशिवाय स्थिती गंभीर होऊ शकते. उष्णतेमुळे हृदयावरही ताण येतो, कारण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो, जो शरीराच्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण करू शकतो.

या प्रकारच्या तीव्र उष्णतेपासून बचाव करायचा असेल, तर काही सोप्या उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी पिणे. तहान लागली नाही तरीही नियमितपणे पाणी, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यासारख्या द्रव पदार्थांचे सेवन करावे. शक्यतो दुपारी ११ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. गरज असल्यास छत्री, टोपी, सनग्लासेस यांचा वापर करावा. सुती आणि हलक्या रंगाचे, सैलसर कपडे परिधान केल्यास शरीराला थंडावा मिळतो. घरातही उष्णतेपासून बचावासाठी उपाय करणे गरजेचे आहे. जसे की खिडक्यांना जाड पडदे लावणे, दरवाजे बंद ठेवणे, जेणेकरून गरम हवा आत येणार नाही. तसेच, घरातील लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

यंदाचा पावसाळा होईल आणखीनच स्पेशल! संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा पालक मुगाची खमंग भजी

उष्णता हा केवळ हवामानातील बदल नाही, तर एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठा धोका आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेणं अत्यावश्यक आहे. सतर्कता आणि सजगता हीच या संकटावर मात करण्याची खरी किल्ली आहे.

Web Title: Can staying in the hot sun cause death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Accident Death
  • summer heat

संबंधित बातम्या

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
1

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Accident News: भयानक! बसचे नियंत्रण सुटले अन्…; 15 जागीच ठार तर 19 जखमी
2

Accident News: भयानक! बसचे नियंत्रण सुटले अन्…; 15 जागीच ठार तर 19 जखमी

Accident News: कार दोन ट्रकमध्ये अडकली अन्…; मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
3

Accident News: कार दोन ट्रकमध्ये अडकली अन्…; मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात

स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; ‘या’ ठिकाणी घडला अपघात
4

स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; ‘या’ ठिकाणी घडला अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.