चालण्याने होईल वेट लॉस (फोटो सौजन्य - iStock)
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे वजन वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. वजन वाढण्यास जास्त वेळ लागत नाही पण ते कमी करणे खूप कठीण आहे.
यासाठी लोक जिममध्ये जातात आणि तासनतास घाम गाळतात. याचा परिणाम त्यांच्या खिशावरही होतो पण वजन मात्र कमी होत नाही. याशिवाय अनेक प्रकारचे आहारदेखील पाळले जातात. हीदेखील एक निरोगी पद्धत आहे. कारण जेव्हा तुम्ही निरोगी खाता तेव्हा ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषण प्रदान करते. शिवाय, तुम्ही अनेक आजारांपासून कोसो मैल दूर राहता. वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा चालणे हा एक उत्तम मार्ग असू शकतो.
आता चालण्याच्यादेखील अनेक पद्धती आहेत, ज्यामध्ये ब्रीस्क वॉकिंग, पॉवर वॉकिंग, ट्रेल वॉकिंग, मायक्रो वॉकिंग असे अनेक वॉक समाविष्ट आहेत. त्यापैकी एक वॉक म्हणजे 6-6-6. हा असाच एक चालण्याचा नियम आहे जो अलिकडच्या काळात चर्चेत आला आहे. वजन कमी करण्यासाठी ते प्रभावी मानले जाते. जर तुम्हालाही जलद वजन कमी करायचे असेल तर 6-6-6 वॉकिंग फॉर्म्युला नक्कीच वापरू शकता. यामुळे तुम्हाला काही दिवसांत फरक जाणवेल. या नियमाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे Tone30 Pilates च्या फिटनेस आणि पिलेट्स तज्ज्ञ आणि डॉ. वंजला श्रावणी यांनी.
काय आहे 6-6-6 वॉकिंग रूल
चालण्याच्या नवी नियमाबाबत माहिती
6-6-6 हा नियम चालण्याचा एक सोपा मार्ग आहे. या नियमानुसार, तुम्हाला ६० मिनिटे म्हणजे एक तास चालावे लागेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे सकाळी ६ किंवा संध्याकाळी ६ च्या दरम्यान कधीही करू शकता. हे करण्यापूर्वी तुम्हाला ६ मिनिटे वॉर्म अप करावे लागेल. यानंतर, ६ मिनिटांचा कूलडाउन देखील आवश्यक आहे.
30 मिनिटे चालणे ठेवते अनेक आजारांना दूर, जाणून घ्या रोज चालण्याचे फायदे
हा नियम कसे काम करतो?
यामुळे तुमच्या कॅलरीज जलद बर्न होतात. याशिवाय, ते चयापचयदेखील मजबूत करते. ज्याच्या मदतीने तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता. जर तुम्ही दररोज ६० मिनिटे चाललात तर तुमच्या शरीरात साठलेली चरबी लवकर वितळू लागेल. चालण्यामुळे हृदयही निरोगी राहते. याशिवाय, तुम्हाला मानसिक शांती देखील मिळते ज्यामुळे तुम्ही तणावात राहत नाही.
आरोग्यासाठी फायदे
चालण्याचे नक्की फायदे काय
यामुळे तुमचा फिटनेस अबाधित राहतो. या वॉक रूलमुळे चरबी जलद बर्न करते. याशिवाय मधुमेह आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. जर तुम्ही या नियमानुसार दररोज चाललात तर तुम्हाला चांगली झोप देखील मिळेल, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक ऊर्जावान वाटेल. जर तुम्हाला आधीच कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर हे करण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फक्त सकाळी चालण्याचे असतात इतके फायदे; जाणून थक्क व्हाल
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.