संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा पालक मुगाची खमंग भजी
राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाचे आगमन झाले आहे. पाऊस पडल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही झणझणीत आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. भजी, पकोडा, पॅटिस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी पालक मुगाची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नेहमीच कांदाभजी किंवा बटाटाभजी घरात बनवली जाते. पण सतत तेच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. घरातील लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा पालक खायला आवडत नाही. पण पालक भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पालक खाल्यामुळे शरीरातील रक्त वाढते, हिमोग्लोबिन वाढते याशिवाय इतरही अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया पालक मूग भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






