
लघवीवर नियंत्रण ठेवता येत नसल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
जरी ते घातक नसले तरी ते महिलांच्या आत्मविश्वासावर, दैनंदिन जीवनावर आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करते. मूत्राशयाला आधार देणारे पेल्विक फ्लोअर स्नायू जेव्हा कमकुवत होतात तेव्हा ही समस्या उद्भवते. बाळंतपण, रजोनिवृत्ती किंवा ओटीपोटाच्या शस्त्रक्रियेनंतर हे अधिक सामान्य आहे. परंतु तरुण महिलांना, विशेषतः ज्या अनेकदा व्यायाम करतात किंवा वजन उचलतात त्यांनाही ही समस्या उद्भवू शकते. डॉ. भाविन पटेल, मूत्रविकार तज्ज्ञ , झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे.
या समस्येमुळे काही महिला जिममध्ये जाणे टाळतात, लांब प्रवास करणे टाळतात किंवा या समस्येशी झुंजत असल्याने बाहेर पडणे टाळू लागतात. ही समस्या अनेकदा दुर्लक्षित राहते, कारण अनेकांना त्यांच्या डॉक्टरांशीही याबद्दल बोलण्यास खूप लाज वाटते. त्यांना शांतपणे संघर्ष करावा लागू शकतो. कालांतराने, यामुळे नैराश्य, नातेसंबंधातील समस्या आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते. हे एखाद्याच्या दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय आणते. हे समजून घेणे महत्वाचे आहे की स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस ही एक वैद्यकीय समस्या असून त्यामध्ये लपवण्यासरखी किंवा लाज वाटण्यासारखीकोणतीही बाबत नाही. म्हणून, वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करू नका. वेळेवर व्यवस्थापन या समस्येचा सामना करण्यास मदत करते.
ही समस्या लाखो महिलांना होते पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर ठरू शकते, याचा मानसिक परिणामही होतो
२. यासाठी उपाय आहेत का?
स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंसवर अनेक उपाय आहेत आणि याची वेळीच काळजी घेणेही गरजेचे आहे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.