Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

प्रश्न पडतो की रोज सकाळी उठल्यावर पाणी थंड प्यावं की गरम ?यावर तज्ज्ञ सांगतात नेमकं काय सांगतात ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2026 | 09:15 PM
Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते
Follow Us
Follow Us:
  • गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं?
  • ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते
निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणं महत्वाचं आहे असं डॉक्टरांकडून वारंवार सांगितलं जातं. पाण्यामुळे अनेक आजार कमी होतात त्यामुळे दिवसभरातून तीन ते चार लीटर पाणी शरीरात जाणं महत्वाचं आहे. खरंतर दिवसभरात जसं पाणी पिणं महत्वाचं आहे तेवढंच सकाळी उठल्यावर पाणी पिणं महत्वाचं आहे. काही सवयी या खूप छोट्या छोट्या असतात पण त्याच तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. सात ते आठ तासाच्या झोपेत शरीराला पुरेसं पाणी मिळत नाही त्यामुळे या वेळेत शरीर काही अंशी डीहायड्रे़ड होतं. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या पहिले पाणी पिणं महत्वाचं आहे.

आता प्रश्न पडतो की रोज सकाळी उठल्यावर पाणी थंड प्यावं की गरम ?यावर तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी प्यायल्याने पचनक्रियेला चालना मिळते. शरीर डीटॉक्स होण्यास देखील यामुळे मदत होते. रात्रभर शरीरात साचलेले विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यास पाण्याची मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होते. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कोमट पाणी फायदेशीर ठरतं. कोमट पाण्यात लिंबू किंवा मध घातल्यास त्याचा फायदा अधिक वाढू शकतो.

फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते! IIT मुंबईच्या संशोधनातून उलगडला ‘म्युकस पॅराडॉक्स’

थंड पाण्याचे परिणाम

सकाळी थंड पाणी पिण्याने शरीराला तात्पुरती ताजेतवानेपणा मिळतो. मात्र अतिशय थंड पाणी पिल्यास पचनक्रिया मंदावू शकते. काही लोकांना घसा दुखणे किंवा सर्दीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे रिकाम्या पोटी थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे.

तज्ज्ञ काय सांगतात?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी कोमट किंवा साधारण तापमान असलेलं  पाणी पिणे अधिक योग्य आहे. यामुळे शरीर हळूहळू सक्रिय होते आणि पचनसंस्था सुरळीतपणे काम करू लागते.

किती पाणी प्यावे?

सकाळी उठल्यानंतर किमान एक ते दोन ग्लास पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. मात्र एकदम जास्त पाणी पिण्याऐवजी हळूहळू घोट घोट पाणी प्यावे.सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे ही सवय आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणात आणि योग्य तापमानाचे पाणी पिल्यास पचन सुधारते, शरीर डिटॉक्स होते आणि दिवसाची सुरुवात ऊर्जेने होते.

पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Health care tips hot or cold which water should you drink on an empty stomach in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.