मंगळागौरीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या पारंपरिक शुभेचछा
श्रावण महिन्यात सगळीकडे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण असते. या महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मंगळागौरी.श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. नवविवाहित तरुणींसाठी मंगळागौर अतिशय स्पेशल असते. मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. मंगळागौरीचे व्रत केल्यामुळे नव दाम्पत्याला सुख-समृद्धी लाभते आणि घरातील अडचणी दूर होतात, असे मानले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत. देवी पार्वतीच्या कृपेने वैवाहिक जीवन सुखी जावे, अशी प्रार्थना मंगळागौरीच्या दिवशी केली जाते.(फोटो सौजन्य – istock)
श्रावण महिन्यात हातांवर काढा ‘या’ सुंदर डिझाईनची मेहंदी, मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद
पावसाच्या रिमझिम सरींनी
चहूकडे दरवळला मातीचा सुवास
एकमेकींना शुभेच्छा देऊन
साजरी करूयात मंगळागौर खास
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा!
फुगडी खेळा वा झोका कुणी
तर कुणी खेळा मंगळागौर
आला श्रावणमास त्याचा
आनंद घेऊया चौफेर
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!
मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय मंगळागौरी..
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा!
श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ
चला मिळून खेळूया मंगळागौरीचे खेळ
मंगळागौर व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनी पारंपरिक थोर
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!
हाती कडे पायी तोडे
पैंजनाची रुणझुण
झुम झुम मधूर ध्वनीच्या
नादामध्ये भक्ताघरी
सोनपावलांनी आली गौरी घरी
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!
मंगळागौरी माते नमन करते तुला,
अखंड सौभाग्य लाभू दे मला.
मंगळागौरी व्रताच्या पुजनाच्या
सर्व सौभाग्यवती भगिनींना
मंगलमय हार्दिक शुभेच्छा
श्रावणात आकाशात कडकडतात विजा..
चला सख्यांनो उत्साहाने करू मंगळागौरीची पुजा..
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा
मंगळागौर पुजनानिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा
कुंकवाच्या धन्याला मिळो मान सन्मान
अखंड सौभाग्याचे, माते, दे वरदान
घुमती बाया, त्यांच्यासवे तुही नाचावे
सुख शांती समृद्धी देवी आम्हांसी द्यावे
श्रावणाच्या आगमनाने बहरली कांती
मंगळागौर पुजनाने मिळो सर्वांना सुखशांती
मंगळागौरी व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!
फुगडी खेळा वा झोका
कुणी तर कुणी खेळा मंगळागौर
आला श्रावणमास त्याचा आनंद घेऊया चौफेर
मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया।।
जय देवी मंगळागौरी।
प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हवेत ‘या’ रंगाचे ब्लाऊज, सर्वच साड्यांवर दिसतील उठावदार
सणासुदीची घेऊन उधळण आला हा हसरा श्रावण सौभाग्यवती पुजती मंगळागौर खेळ खेळुनी पारंपरिक थोर मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!
फुगडी खेळा वा झोका कुणी तर कुणी खेळा मंगळागौर आला श्रावणमास त्याचा आनंद घेऊया चौफेर मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!