श्रावण महिन्यात अनेक सण, पूजा आणि धार्मिक कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांच्या दिवशी महिला पारंपरिक वेशभूषा करत छान तयार होतात. महिला सणाच्या दिवशी नवीन साडी नेसतात. पण बऱ्याचदा घाईगडबडीमध्ये साडी विकत घेण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी आई, बहीण, सासू किंवा मैत्रिणीची साडी आणून नेसली जाते. मात्र साडीवर मॅच होईल असा ब्लाऊज लगेच कुठून आणावा? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्याही साडीवर मॅच होणाऱ्या ब्लाऊजच्या रंगांबद्दल सांगणार आहोत. ब्लाऊजचे हे रंग सर्वच महिलांच्या कपाटात असायलाच हवे. (फोटो सौजन्य – pintrest)
प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हवेत 'या' रंगाचे ब्लाऊज
हल्ली सर्वच महिलांच्या कपाटात लाल रंगाचा काठ असलेल्या भरपूर साड्या पाहायला मिळतील. त्यामुळे तुमच्याकडे एखादे तरी लाल रंगाचे ब्लाऊज असायलाच हवे. लाल रंगाचा ब्लाऊज सर्वच साड्यांवर सुंदर दिसतो.
कोणत्याही उठावदार रंगाच्या साडीवर तुम्ही जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता. पिवळ्या किंवा गुलाबी रंगाच्या साडीवर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज शोभून दिसेल.
हिरवा, जांभळा, निळा, मोरपंखी, करडा रंग, पिस्ता किंवा पांढऱ्या रंगाच्या साडीवर डार्क गुलाबी रंगाचा ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल. गुलाबी रंगाचा ब्लाऊज प्रत्येक महिलेकडे असायलाच हवा.
कॉटन किंवा शिफॉनच्या कोणत्याही रंगाच्या साडीवर तुम्ही पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घालू शकता. कॉटन, चिकनकारी किंवा इतर कोणत्याही फॅब्रिकमध्ये तुम्ही पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
हिरव्या रंगाचा किंवा हिरव्या रंगाची काठ असलेला ब्लाऊज कोणत्याही रंगाच्या साडीवर उठून दिसतो. हल्ली महिला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्यास जास्त प्राधान्य देतात. हिरव्या रंगाच्या ब्लाऊजवर तुम्ही पिवळा, गुलाबी, लाल, जांभळ्या रंगाची साडी नेसू शकता.