श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वचघरांमध्ये सामोवारी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी महिला छान तयार होऊन शंकरांची पूजा करतात. शंकराच्या मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येक महिलेच्या हातावर मेहंदी असतेच. मेहंदीशिवाय सण अपूर्णच वाटतो. त्यामुळे यंदाच्या श्रावण महिन्यात तुम्हीसुद्धा हातांवर मेहंदी काढण्याचा विचार करत असाल तर या डिझाईन्सची मेहेंदी नक्की ट्राय करा. यामुळे तुमचे हात चारचौघांमध्ये अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतील. (फोटो सौजन्य – pintrest)
श्रावण महिन्यात हातांवर काढा 'या' सुंदर डिझाईनची मेहंदी
श्रावण महिना शंकर पार्वतीला समर्पित केला जातो. त्यामुळे हातांवर तुम्ही शंकर आणि पार्वतीचे डिझाईन काढू शकता. या डिझाईनची मेहंदी पाहून सगळेच तुमचं कौतुक करतील.
मेहेंदीमध्ये काही हटके डिझाईन हवे असतील तर तुम्ही केदारनाथ मंदिर हातांवर काढू शकता. केदारनाथ मंदिर काढून त्याच्या आजूबाजूने केलेले बारीक नक्षीकाम अतिशय उठावदार दिसेल.
श्रावण महिन्यात अनेक गावांमध्ये वडाच्या झाडाला झोके घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हातांवरील मेहेंदीमध्ये सुंदर झोका घेणाऱ्या मुलीची डिझाईन काढू शकता.
घाईगडबडीमध्ये अतिशय कमी वेळात जर तुम्हाला मेहंदी काढ्याची असेल तर तुम्ही या सुंदर डिझाईनची मेहंदी हातांवर काढू शकता. हातांवर फुलांच्या आकारातील मेहेंदी सुंदर दिसते.
हातांवर मेहेंदी काढताना सगळ्यात पहिली पसंती मोराच्या डिझाईनला दिली जाते. हातांवर बारीक नक्षीकाम करत सुंदर मोराची डिझाईन काढू शकता. मेहंदीमध्ये काढलेला मोर हातांवर अतिशय खुलून दिसेल.