सर्व्हायकल आरोग्याची काळजी घेण्याची गरज काय (फोटो सौजन्य - iStock)
यशस्वी गर्भधारणेसाठी गर्भाशय आरोग्य चांगले आरोग्य राखणे आवश्यक आहे. मातृत्वाचा प्रवास सुरु करण्यापुर्वी महिलांना गर्भाशयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही खास टिप्स या लेखाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे ‘Cervix’ (सर्व्हिक्स) किंवा ग्रीवा. गर्भवती महिलेला प्रसूती होईपर्यंत बाळाला स्थिर व सुरक्षित राखण्यासाठी गर्भाशय ग्रीवा फायदेशीर ठरते. ठेवण्यासाठी जबाबदार असते. तुम्हाला माहिती आहे का? गर्भाशय ग्रीवा निरोगी असल्यास बाळाच्या योग्य विकासात मदत होते. अकाली जन्म किंवा गर्भपातासारख्या गुंतागुंत टाळण्यास मदत होते. बऱ्याच महिलांना गर्भाशय ग्रीवाच्या आरोग्याचे महत्त्व माहित नसते. गर्भधारणेदरम्यान गर्भाशय ग्रीवाच्या आरोग्याच्या व्यवस्थापन कसे कराल याविषयी डॉ. नितीन गुप्ते, स्त्रीरोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय पुणे यांनी खाली दिलेल्या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.
वेळोवेळी तपासणी
नियमित तपासणी ही तज्ज्ञांना गर्भाशय ग्रीवाच्या समस्या जसे की संसर्ग, असामान्यता किंवा गर्भधारणेवर परिणाम करू शकणारे बदल यासारखी सुरुवातीच्या लक्षणे शोधण्यास मदत करते. वेळोवेळी तपासणी केल्याने कोणत्याही विलंब न करता योग्य प्रकारचे उपचार सुरू करण्यास मदत होईल. साधारण वयाच्या 30 वयानंतर प्रत्येक महिलेने सर्व्हायकल आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
काय आहे Cervical Cancer ची ओळख? साधेसे संकेतही ठरतील जीवघेणे
सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे
सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा आणि सर्व्हायकल आरोग्य राखा
हे सर्वज्ञात आहे की संभोगादरम्यान संरक्षण पर्यायाचा वापर करणे हे लैंगिक आरोग्य चांगले राखणे तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या संसर्गापासून दूर राहण्यास मदत करते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होऊ शकते. तुम्ही जेव्हा संभोग कराल तेव्हा कंडोमचा योग्य वापर करावा. तसंच आपल्या व्हजायनाची योग्य काळजी घ्यायला हवी, जे अत्यंत गरजेचे आहे
वजन नियंत्रित राखणे
संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने गर्भाशयाच्या मुखावरील ताण कमी होतो आणि गर्भधारणेदरम्या होणारा मधुमेह टाळता येतो तसेच कोणत्याही गुंतागुंतीशिवाय महिलेस निरोगी गर्भधारणा अनुभव घेता येतो. तुमच्या वय आणि उंचीनुसार तुमचे वजन योग्य आहे की नाही याची काळजी तुम्हाला वेळोवेळी घ्यायला हवी. तसंच तुमचं वजन वाढतंय हे कळल्यानंतर वेळीच ते कमी करण्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी
Cervical Cancer: लसीकरणाने प्रतिबंध करता येणार गर्भाशयाचा कर्करोग, तज्ज्ञांचा सल्ला
धुम्रपान टाळा
महिलांनी धुम्रपान करणे टाळावे
विविध अभ्यासांनुसार, धूम्रपान गर्भाशयाच्या मुखाला कमकुवत करते, ज्यामुळे अकाली प्रसुती आणि गर्भधारणेदरम्यानची गुंतागुंत वाढते. कोणत्याही अडचणीशिवाय गर्भधारणा होण्यासाठी महिलांनी धुम्रपानाची सवय सोडणे गरजेचे आहे. हल्ली केवळ पुरूषच नाही तर अनेक महिलाही प्रमाणाच्या बाहेर स्मोकिंग करताना दिसून येतात. पण तुम्हाला सर्व्हायकल आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर स्मोकिंग करणे सोडून द्यावे
तणावाचे व्यवस्थापन करा
तणाव हा संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतो. हल्ली घरात, कामाच्या ठिकाणी प्रत्येक जागी पुरुषच नाही तर महिलांनाही ताण असतो, म्हणून गर्भाशयाच्या मुखाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दिर्घ श्वास घ्या, योगा किंवा ध्यानधारणा करा जेणकरुन तुम्हाला तणावापासून दरू राहण्यास मदत होईल. ताणतणावापासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे
हायड्रेटेड रहा आणि पूरक आहाराचे सेवन करा
हायड्रेट राहणे अत्यंत गरजेचे आहे
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका. भरपूर पाणी पा व शरीर हायड्रेटेड राखा. संतुलित आहाराचे सेवन करा जे तुमच्या शरीराला गर्भधारणेसाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. जर तुम्हाला संसर्गाचे निदान झाले असेल, तर गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे काळजीपूर्वक पालन करा. या महत्त्वाच्या टिप्सने महिलांना त्यांच्या गर्भाशयाच्या मुखाचे आरोग्य सुधारणे शक्य होईल.