
हिवाळ्यातील न्यूमोनिया आणि तापासाठी काय काळजी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)
आपल्याला साधा फ्लू झालाय की काहीतरी अधिक गंभीर दुखणे आहे हे ओळखणे कठीण जाऊ शकते, कारण काही समान लक्षणे दोन्ही परिस्थितींमध्ये दिसून येतात. खोकला, थकवा, घसा बसणे, अंगदुखी किंवा अगदी धाप लागण्यासारखी लक्षणे ही फ्लूसारख्या श्वसनसंस्थेच्या आजाराची असू शकतात किंवा न्यूमोनियाचीही असू शकतात. ही लक्षणे तशीच राहिली किंवा आणखी बळावली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम ठरते.
डॉ. अरुण वाधवा, एमबीबीएस, एमडी, पीडिअॅट्रिक डॉ. अरुण वाधवा क्लिनिक, दिल्ली हे या मोसमादरम्यान अचूक निदानाच्या महत्त्वावर भर देताना सांगतात, “हिवाळी आजारांचे प्रमाण वाढत असताना, योग्य निदान करून घेणे हाच आजारातून बरे होण्याचा व गुंतागूंती टाळण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. तुम्हाला बरे वाटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका – सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.”
ज्येष्ठांमधील न्यूमोनिया: लक्षणे, कारणे आणि उपचार, तज्ज्ञांनी केला खुलासा
वेळच्यावेळी तपासण्या करून घेण्याची गरज
आपल्या वेगवान आयुष्यामध्ये, कुणालाही आजारामुळे बाजूला पडण्याची इच्छा नसते. इथेच वेगवान चाचण्या मदतीला येतात, ज्या फ्लू आणि न्यूमोनियासारख्या श्वसनसंस्थेच्या आजारांचे निदान करण्याचा एक झटपट व कार्यक्षम मार्ग दाखवतात.
डॉ. सोनू भटनागर, मेडिकल अफेअर्स डायरेक्टर, इन्फेक्शियस डिसीज, अबॉट वेळीच तपासण्या करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगतात, “श्वसनसंस्थेला होणाऱ्या संसर्गांना परिणामकारकरित्या हाताळण्याच्या कामी चाचण्या महत्त्वाची भूमिका निभावतात. श्वसनसंस्थेच्या वेगवेगळ्या आजारांसाठी रॅपिड टेस्टिंगचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे झटपट व अचूक निदान मिळणे शक्य होते.” या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही साध्यासोप्या उपाययोजना नक्की काय आहे याची आपण अधिक माहिती घेऊया
कोणत्या आहेत साध्या योजना
लक्षात ठेवा
हिवाळा ऐन भरात असताना, आपण दोन पावले पुढे राहत आपल्या आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही बरे असाल तर हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि इतरांपासून अंतर राखणे अशा काही सोप्या प्रतिबंधात्मक सवयी बाळगा. फ्लू आणि न्यूमोनियासाठीच्या लस घेणे हा सुरक्षित राहण्याच्या काही सर्वोत्तम मार्गांपैकी एक मार्ग आहे. या उपाययोजना केल्याने तुम्हाला सुरक्षितपणे या ऋतूचा आनंद घेता येईल आणि तुमच्या कुटुंबातील तुमचे प्रियजनही निरोगी राहतील.