Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: भावाबहिणीच्या नात्यात दुरावा आणते अशी वेळ, नातं सुधारण्यासाठी वापरा चाणक्य नीति

Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये आयुष्यात यशस्वी होण्यासोबतच नातेसंबंधांचेही धडे देण्यात आले आहेत. आजही आपल्याला हे सल्ले नक्कीच उपयोगी ठरतात. आचार्य चाणक्य यांनी भाऊ-बहिणीच्या नात्याबाबत सल्ला दिला आहे. या नात्याचा धागा साधारण कधी कमकुवत होऊ शकतो आणि दुरावा येतो हे सांगून नातं सुधारण्याचे धडेही दिले आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2024 | 11:31 AM
चाणक्य नितीमधून शिका कसे टिकवाल भावाबहिणीचे नाते

चाणक्य नितीमधून शिका कसे टिकवाल भावाबहिणीचे नाते

Follow Us
Close
Follow Us:

भावाबहिणीचे नाते खूप पवित्र असते. आपल्या बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे आणि आपल्या भावाचा आदर करणे हे बहिणीचे कर्तव्य आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर आपुलकीने राखी बांधते कारण तिला विश्वास असतो की काहीही झालं तरी आपल्याबरोबर आपला भाऊ भक्कमपणे उभा राहणार आहे. पण, जगात असं एकही नातं नाही ज्यात चढ-उतार नाहीत. कधीकधी चुकीची परिस्थिती आणि वेळ नात्यामध्ये अंतर निर्माण करतात. 

आचार्य चाणक्य यांनीही या भावा-बहिणीच्या नात्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कठीण प्रसंगी भाऊ आणि बहीण हा आधार मानला जातो, दोघांनीही आपले कर्तव्य पार पाडले नाही तर अडचणी निर्माण होतात. चाणक्य नीतीमध्ये भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा का येतो ही कारणे सांगण्याबरोबरच हे नाते कशा पद्धतीने सुधारण्यात येऊ शकते हेदेखील सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

विश्वासातील कमतरता 

भावाबहिणीवरील विश्वास कमी होऊ देऊ नका

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, भाऊ आणि बहिणीचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर आधारीत असते. खोटेपणाच्या पायावर कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात खोटेपणाला जागा नाही. खोटे बोलणे नाते कमकुवत करते, त्यामुळे या नात्यात विश्वासात कमतरता येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. 

हेदेखील वाचा – रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ, योग, महत्त्व

आदर आणि सन्मान 

भावाबहिणीच्या नात्याचा आदर ठेवा

आचार्य चाणक्य यांच्या मते, भावा-बहिणीच्या नात्यामध्ये आदर सर्वात महत्त्वाचा असतो. भाऊ आणि बहीण दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे. पण जेव्हा ते कमी व्हायला लागते तेव्हा नातं कमकुवत व्हायला लागतं. याशिवाय एकमेकांच्या जवळ भावनिक आणि मानसिकदृष्ट्या नसल्यामुळे दुरावा निर्माण होऊ लागतो. म्हणून कितीही भांडलात किंवा रागावलात तरीही आदर आणि सन्मान कमी होऊ देऊ नका. 

प्रेम आवश्यक

नात्यामध्ये प्रेम असणे अत्यंत गरजेचे

भाऊ-बहीण हे भांडतातच. कोणत्याही भावाबहिणीच्या नात्यात भांडणं झाली नाहीत असं कधीच ऐकू येणार नाही. कितीही भांडत असले तरी त्यांच्यात प्रेमाची कमतरता भासू नये. अशा स्थितीत आचार्य चाणक्य म्हणतात की जर भाऊ-बहिणीमध्ये एकमेकांबद्दल प्रेम नसेल आणि एकमेकांना साथ दिली नाही तर असे नाते ओझे बनते, त्यामुळे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नका.

हेदेखील वाचा – राखी बांधण्यापूर्वी बहिणींनी ‘हे’ काम करावे, जाणून घ्या उपाय

वाईट काळात साथ 

वाईट काळात द्यावा भावाबहिणीने एकमेकांना आधार

भाऊ-बहिणीच्या अनमोल नात्याची परीक्षा वाईट काळातच होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे, जर भाऊ-बहीण सुख-दुःखात एकमेकांना साथ देत नसतील तर त्यांचे नाते टिकून राहत नाही. गरज असताना तुम्ही मदत करू शकत नसाल तर असे नाते जोडण्यात काही अर्थ नाही.

Web Title: Chanakya niti says which time to break bond between brother and sister suggests the solutions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • Chanakya Niti
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Chanakya Niti: यश मिळाल्यावर नात्यांमध्ये येतो बदल? काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: यश मिळाल्यावर नात्यांमध्ये येतो बदल? काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

फॅमिली टाइम महत्त्वाचा! मानसिक आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे फायदे माहिती आहेत का?
2

फॅमिली टाइम महत्त्वाचा! मानसिक आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे फायदे माहिती आहेत का?

Relationship Tips : तुमचा जोडीदार घटस्फोटाचा विचार तर करत नाही ना? या 11 संकेतांद्वारे ओळखा, नाहीतर …
3

Relationship Tips : तुमचा जोडीदार घटस्फोटाचा विचार तर करत नाही ना? या 11 संकेतांद्वारे ओळखा, नाहीतर …

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?
4

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.