Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील या दुर्गम किल्ल्याला भेट दिलीत का? शिवकाळात कैद्यांची होती व्यवस्था

महाराष्ट्रातील किल्ले जगप्रसिद्ध आहेत. इथल्या किल्ल्यांचे सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते. तुम्ही आजवर अनेक गडकिल्ल्यांविषयी ऐकले असेल मात्र वासोटा किल्ल्याला कधी भेट दिली आहे का? शिवकालीन काळात इथे कैद्यांना कैद केले जात असे. वाचा सविस्तर माहिती.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 08, 2024 | 01:24 PM
महाराष्ट्रातील या दुर्गम किल्ल्याला भेट दिलीत का? शिवकाळात कैद्यांची होती व्यवस्था
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राज्यात अनेक पर्यटस्थळे आहेत जी पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात हजारो पर्यटकांची कूच होत असते. येथील अनेक सुंदर स्थळे अक्षरशः पर्यटकांना भुरळ घालत असतात. किल्ले म्हटलं की, अनेकांना रायगड, प्रतापगड या किल्ल्यांची आठवण येते मात्र तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रात असाही एक साहसी किल्ला आहे, जिथे पर्यटक ट्रेकिंगचा मनसोक्त आनंद लुटू शकतात.

काय आहे किल्ल्याचे नाव?

या किल्ल्याचे नाव आहे वासोटा. हा किल्ला पुरातनकालीन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याला बांधण्यात आले होते. घनदाट जंगलातून आणि झाडाझुडपातून येथे जाण्याचा मार्ग आहे.  मात्र इथे जाण्याची वेगळीच मजा आहे.

हजारो पर्यटकांसाठी पर्वणी 

वासोटा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. इतिहासातही या किल्ल्याच्या महत्त्वाच्या नोंदी आहेत. त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं. शिवकालीन काळात या किल्ल्याचा वापर कैद्यांना इथे कैद करून ठेवण्यासाठी केला जात असे. कालांतराने याचे नाव व्याघ्रगडवरून वासोटा असे पडले.

किती वेळ लागतो?

वासोटा किल्ल्याचा प्रवास जवळपास 2 ते 3 तासांचा आहे. इथे पायी जावे लागते. पायी जाताना कितीही पाय थकले तरी इथले सौंदर्य पुढे जाण्यासाठी मनाला प्रेरित करत असतो. त्यामुळेच नैसर्गिक सौंदर्य आणि साहसाने भरलेला हा किल्ला कधीच ट्रेकर्सना निराश होऊ देत. म्हणूनच सध्या ट्रेकिंगसाठी हा किल्ला ट्रेकर्सचे मुख्य आकर्षण बनत चालले आहे.

वासोटा किल्ल्यावर कसे जावे?

वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली इथून बोटीतून प्रवास करावा लागतो. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून बोटिंग करत जाताना अत्यंत निसर्गमय सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. बोटिंगनंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो. या किल्ल्याला जाण्यासाठीचा संपूर्ण प्रवास हा घनदाट जंगलांतून करावा लागतो. यावेळी रस्त्यात तुम्हाला काही जंगली प्राण्यांचेही दर्शनही घडू शकते.

[read_also content=”चारधाम यात्रेला जायचा प्लॅन आखताय? मग अशाप्रकारे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही तर चेक पॉईंटवरूनच घरी पाठवतील https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-planning-to-go-to-chardham-yatra-then-do-your-online-register-like-this-544241.html”]

मनमोहक दृष्यं

किल्ल्यावर पोहचताच तुम्हाला समोर मारुतीरायाचे दर्शन घडेल. किल्ल्यावरून दिसणारे मनमोहक दृष्यं तुम्हाला तुमचा सर्व थकवा विसरवून टाकण्यास भाग पाडतील. इथले विलोभनीय दृष्यं पाहून इथे पुन्हा येण्याची इच्छा मनात रुजू लागेल. वासोटा किल्ल्यावर मुक्कामाची परवानगी नसल्याने एका दिवसात हा ट्रेक करावा लागतो.

किल्यावर जाताना कोणती काळजी घ्यावी

  • साताऱ्याहून वासोट्याला जायचे असल्यास कास पठार मार्गे बामनोली गावात प्रथम जावे लागेल
  • जर तुम्ही मुंबई पुण्यावरून निघत असाल तर शक्यतो रात्रीचा प्रवास करा
  • सकाळी बामणोलीत पोहोचून दिवसभर वासोटा पाहायचा आणि संध्याकाळी परतीचा प्रवास करता येऊ शकतो
  • गडावर जात असताना आपल्या जेवणाची सोय आधीच करून जावी
  • लक्षात ठेवा गडावर कोणतीही जेवणाची सोय नाही. पर्यायी बामणोलीमधून जेवणाचे डबे घेऊन तुम्ही जाऊ शकता
  • गडावर जात असताना प्लास्टिक पिशव्या, बाटल्या घेऊन जात असाल तर गडावरून उतरताना जबाबदारीने प्लास्टिकच्या वस्तू गडाच्या खाली घेऊन जा, अन्यथा वनविभागाकडून तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Web Title: Chatrpati shivaji maharaj kept prisoners at vosota fort now its a favourite place of treckers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 01:08 PM

Topics:  

  • fort

संबंधित बातम्या

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव
1

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव

समुद्राच्या मिठीतील अजरामर वास्तू…महाराष्ट्रातील ‘ते’ जलदुर्ग जे आजही आहेत इतिहासाचे जिवंत साक्षीदार
2

समुद्राच्या मिठीतील अजरामर वास्तू…महाराष्ट्रातील ‘ते’ जलदुर्ग जे आजही आहेत इतिहासाचे जिवंत साक्षीदार

Lohgad Fort: ऐतिहासिक लोहगड किल्ल्याजवळ मोठा आवाज झाला अन्…
3

Lohgad Fort: ऐतिहासिक लोहगड किल्ल्याजवळ मोठा आवाज झाला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.