
फोटो सौजन्य: iStock
आजकालच्या लहान मुलांना मोबाईल वापरण्याची खूप वाईट सवय लागली आहे. जेवताना तर हमखास लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतोच. याला थोड्या फार प्रमाणात पालक सुद्धा कारणीभूत आहेत. त्यात कोव्हीडनंतर ऑनलाईन क्लासेस मोठ्या प्रमाणात अनेक क्लासेस आणि कॉलेजेस घेऊ लागले. जे आज देखील चालू आहे. परंतु सतत ऑनलाईन क्लास अटेंड करणे तुमच्या मुलाचे आरोग्य बिघडवू शकते.
ऑनलाईन क्लासेससाठी मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अतिवापरामुळे मुलं व्हर्च्युअल ऑटिझम नावाच्या अजराला बळी पडत आहे. एका अहवालानुसार ऑटिझमच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात या विषयावर अनेक संशोधने झाली आहेत, ज्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे की 4-5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये व्हर्च्युअल ऑटिझमचा धोका लक्षणीय वाढला आहे. मोबाईल फोन, टीव्ही, कॉम्प्युटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या व्यसनामुळे आजकाल मुलांना बोलण्याचे विकार देखील होत आहे.
कधी विचार केलाय लग्नाच्या पहिल्या रात्री का प्यायले जाते हळद-केशर दूध? ‘ही’ आहे इंटरेस्टिंग स्टोरी
सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. एक वर्षाची मुलेही फोन, टॅब आणि टीव्हीशिवाय अन्न खात नाही आहेत. यामुळे त्यांना अनेक आजार होण्याची दाट भीती असते.
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्टर्न फिनलंड आणि युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेस 2023 द्वारे केलेल्या संशोधनानुसार, जी मुले फोन वापरतात, त्यांना तरुण वयात हृदयविकाराचा धोका जास्त असतो. हे असे घडते कारण फोन पाहताना ते शारीरिकदृष्ट्या तितके सक्रिय नसतात. जे मुले कमी सक्रिय असतात त्यांना हृदय व स्ट्रोकचा धोका जास्त असतो. वजन आणि प्रेशर जरी नियंत्रणात असले तरी हृदयविकाराचा झटका वाढतो. हे संशोधन 1990 आणि 1991 मध्ये जन्मलेल्या 14,500 मुलांवर करण्यात आले आहे.
या संशोधनात असे आढळून आले आहे की जी मुले जास्त फोन आणि टॅब पाहतात, त्यांची शारीरिक हालचाल मंदावते. फोनवर जास्त वेळ घालवल्यास मुले गंभीर इकोकार्डियोग्राफी आजाराला बळी पडू शकतात. त्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय होत आहेत.
आजकाल आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे ते मुलांना जास्त वेळ देत नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यावा. त्यांच्याशी संवाद साधावा. तरच मुलं मोबाईलपासून दूर राहतील.