Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

पौगंडावस्थेत प्रवेश करताना मुलांच्या स्वभावात बदल होणं, त्यांनी रागावणे किंवा चिडचिड करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अनेकदा हा चिडचिडेपणा इतका तीव्र होतो की, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 03:13 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुमचीही मुलं लहानसहान गोष्टींवरुन चिडचिड करतात का?
  • हे बदल गंभीर असू शकतात.
  • चिडचिडेपणाकडे दुर्लक्ष का करू नये?
Parenting Tips: पौगंडावस्थेत प्रवेश करताना मुलांच्या स्वभावात बदल होणं, त्यांनी रागावणे किंवा चिडचिड करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अनेकदा हा चिडचिडेपणा इतका तीव्र होतो की, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अशा वेळी मानसोपचार किंवा महागडी औषधे हाच एकमेव पर्याय उरतो, जो प्रत्येकाला परवडणारा नसतो. पण आता एका नवीन संशोधनातून एक महत्त्त्वाची बातमी समोर आली आहे की जीवनसत्त्वे आणि खनिजे मुलांमधील गंभीर चिडचिडेपणा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात.

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

चिडचिडेपणाकडे दुर्लक्ष का करू नये?

मुलांची रोजची चिडचिड ही केवळ ‘बॅड मूड’ नसून ती एका गंभीर समस्येचे लक्षण असू शकतं. यामुळे मुले नकारात्मक गोष्टींवर तीव्र प्रतिक्रिया देतात. त्यांना अचानक राग येतो आणि त्यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, हा चिडचिडेपणा पुढे जाऊन नैराश्य, चिंता आणि आत्महत्येसारख्या नकारात्मक विचारांना जन्म ही देऊ शकतो. अशा गंभीर समस्यांना सामोरं जाण्यापेक्षा कमी दुष्परिणाम असलेले आणि सुरक्षित उपचार शोधणे गरजेचे होते.

काय सांगतं नवीन संशोधन?

12 ते 17 वयोगटातील 132 मुलांवर एक विशेष चाचणी घेण्यात आली. या मुलांना दोन गटांत विभागून एका गटाला सूक्ष्म पोषक घटक (व्हिटॅमिन्स आणि खनिजे) असलेल्या गोळ्या दिवसातून तीन वेळा देण्यात आल्या. 8 आठवड्यांनंतर आलेले निष्कर्ष थक्क करणारे होते.

गंभीर प्रकरणांत मोठे यश: ज्या मुलांमध्ये ‘मूड स्विंग्स’ किंवा हिंसक प्रवृत्ती जास्त होती, अशा 64% मुलांमध्ये व्हिटॅमिन्समुळे सकारात्मक सुधारणा दिसून आली आहे. याउलट, साध्या गोळ्या घेणाऱ्या मुलांमध्ये हे प्रमाण केवळ 12.5% इतकंच होते.

पालकांचे समाधान: जीवनसत्त्वं घेणाऱ्या मुलांच्या सामाजिक वर्तनात आणि वागण्यात वेगाने सुधारणा झाल्याचे त्यांच्या पालकांनीही नोंदवलं आहे.

नकारात्मक विचारांत घट: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अभ्यासाच्या सुरुवातीला ज्या 25% मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, ते सूक्ष्म पोषक घटकांच्या सेवनानंतर त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होऊन हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले.

संशोधन महत्त्वाचे का आहे?

हे संशोधन सिद्ध करते की, मुलांचा राग किंवा चिडचिड हा केवळ मानसिक प्रश्न नसून तो शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेशीही जोडलेला असू शकतो. पारंपारिक मानसोपचारांना ‘व्हिटॅमिन्स आणि खनिजे’ हा एक सुरक्षित, स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.

जर तुमचं मूल सतत चिडचिड करत असेल, तर त्याला ओरडण्याऐवजी किंवा केवळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी, त्याच्या आहारातील पोषक घटकांकडे लक्ष देणे हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. जीवनसत्त्वे आणि खनिजे मुलांचे मानसिक आरोग्य सुधारून त्यांना आनंदी आयुष्य जगण्यास मदत करतात.

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

Web Title: Health beyond tantrums why vitamin deficiencies might be making your child more irritable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Good for Health
  • Healhy Lifestyle
  • health care news
  • health issue
  • Health Tips
  • lifestyle news in marathi
  • parenting tips

संबंधित बातम्या

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
1

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा
2

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
3

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?

रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप
4

रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.