
Christmas 2025 : ख्रिसमसनिमित्त तुमच्या घराला द्या स्टायलिश आणि एलिगंट लूक; या टिप्सने प्रत्येक कोपरा होईल आकर्षक
सांता जाड नव्हताच! लाल कपडे, रेनडिअर आणि भेटवस्तू… जाणून घ्या सांताक्लॉज कसा बनला ‘ख्रिसमसचा राजा’
हिरव्या, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू : ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही ख्रिसमसच्या खास हिरव्या, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू अशा प्रकारे सजवू शकता. या रंगांची थीम फॉलो करून तुम्ही तुमची लिव्हिंग रूम अधिक चांगली बनवू शकता. ख्रिसमस स्टॉकिंग्ज आणि धनुष्यांसह कागदाची सजावट सर्वोत्तम आहे. तसेच घरच्या घरी स्नो मैंन बनवण्यासाठी कापसाचा वापर करा. कमीत कमी साहित्यात स्नो मॅन बनवून तयार होतो.
दरवाजा : घराचा मुख्य दरवाजा बॉल हगिंग, फुलं, ख्रिसमस बेल या वस्तू वापरून सजवू शकता. घराचा मुख्य प्रवेश सुंदर आणि आकर्षक असेल तर घराची शोभा आणखीनच वाढते.
चिमुकल्यांसाठी ख्रिसमस ट्री
जर घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी खास कार्टून थीग असलेली सजावट करणे आवश्यक आहे. मिकीच्या ऐवजी तुम्ही मुलांच्या आवडीच्या कार्टून गोष्टींनी घर सजवू शकता. घराच्या डेकोरेशनमध्ये लहान किंवा मोठे खिसमस ट्री लावता येतील. कागदी दिवे, फुले, पाने, घंटा यांच्याबरोबरच कागदाच्या शीटपासून बनवलेले ख्रिसमस ट्री देखील अतिशय गोंडस आणि कस्टमाइझ लूक देईल,
लाईट्स डेकोरेशन
ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही घराच्या आत किंवा बाहेर बाहेत दिवे लावून अशी सजावट करू शकता. अर्थात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना तुमची सजावट सर्वात जास्त आवडेल. परी दिवे वापरून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता. खिडक्या, बाल्कनी आणि भिंतींवर फेयरी लाइट्स लावता येतील, टेबलवर फुलं ठेवून घर सजवता येईल.
वॉल डेकोरेशन
वॉलसाठी लाइटिंग्स किंवा ख्रिसमसच्या थीमनुसार देखील डेकोरेशन करू शकता. डायनिंग टेबलवर लाल, सोनेरी, किंवा पांढऱ्या रंगाचा टेबल रनर वापरू शकता. यामुळे घर अधिक छान दिसेल.
Christmas 2025 : ख्रिसमसला मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचंय? मग त्यांना गिफ्ट करा या खास भेटवस्तू
गिफ्ट बॉक्स
तुम्ही ख्रिसमस ट्री जवळ सुंदर असे गिफ्टचे बॉक्स ठेवू शकता. हे गिफ्ट’ बॉक्स पेपरच्या किंवा पुठ्याच्या साहाय्याने घरी देखील बनवता येतात.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.