फुफ्फुसांना चिकटलेली घाण स्वच्छ करण्यासाठी न चुकता करा 'या' पेयांचे सेवन
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे फुफ्फस. फुफ्फुस शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर फेकून देतात. याशिवाय फुफ्फुसे सतत ऑक्सिजन रक्तात मिक्स होऊन शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते. पण बऱ्याचदा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. फुफ्फुसांसंबधित आजार झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. प्रदूषण, धूम्रपान, हवामानातील बदल आणि सतत तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे फुफ्फुसांमध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते. फुफ्फुसांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे फुफ्फुसांचा कर्करोग किंवा इतर आजार होऊ शकतात.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांमुळे सतत खोकला येणे, सर्दी, नाकातून पाणी वाहणे किंवा ताप इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत खोकला आल्यामुळे फुफ्फुसांवर तणाव येतो, ज्यामुळे फुफ्फसांना सूज येणे किंवा वेदना होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फुफ्फसांमध्ये चिटकून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. फुफ्फुसांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी हर्बल टी चे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र दुधाची चहा पिण्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सौम्य प्रमाणात कॅफिन आढळून येते, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये वाढलेली जळजळ कमी होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. याशिवाय ग्रीन टी प्यायल्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालू राहते.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय घशात वाढलेली खवखव दूर करण्यासाठी मधाचे सेवन केले जाते. लिंबामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. टोपात पाणी गरम करून त्यात किसलेलं आलं टाकून उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून मध आणि लिंबाचा रस टाकून सेवन करावे. यामुळे फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.
जेवणातील पदार्थाची चव आणि रंग वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीशिवाय अपूर्णच वाटते. हळदीमध्ये करक्यूमिन आढळून येते तर आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा घटक आढळून येतो. यामुळे शरीरात वाढलेली सूज कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या पाण्यात हळद टाकून मिक्स करा आणि उपाशी पोटी सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. सर्दी, फ्लू किंवा श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हळद आणि आल्याच्या पाण्याचे सेवन करावे.
मानवी शरीरात किती फुफ्फुसे असतात?
मानवी शरीरात दोन फुफ्फुसे असतात – उजवे आणि डावे. उजवे फुफ्फुस डाव्यापेक्षा थोडे मोठे असते.
फुफ्फुसांचे मुख्य कार्य काय आहे?
फुफ्फुसांचे मुख्य कार्य म्हणजे रक्ताभिसरण (circulatory) प्रणालीद्वारे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर काढणे, ज्यामुळे श्वासोच्छ्वास सुरळीतपणे चालू राहतो.
फुफ्फुसांना कोणत्या आजारांचा धोका असतो?
फुफ्फुसांना दमा (asthma), ब्राँकायटिस (bronchitis), फुफ्फुसाचा कर्करोग (lung cancer), आणि न्यूमोनिया (pneumonia) यांसारख्या आजारांचा धोका असतो.