मुघलकाळातील 'हा' जुना उपाय कबुतरांपासून मिळवून देईल कायमची सुटका
घराच्या बाल्कनीमध्ये, टेरेसवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे कबुतर आपले वास्तव्य करतात. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही समस्या आणखीनच गंभीर झाली आहे. घराच्या बाल्कनीमध्ये कबुतर येऊन बसल्यानंतर सगळीकडे घाण निर्माण करतात. कबुतर अतिशय छोट्या जागेमध्ये सुद्धा आपली घरटी बांधून वास्तव्य करतात.प्रामुख्याने कबुतर अंडी घालण्यासाठी जागा शोधात असतात. बाल्कनीमध्ये कबुतर एकदा आले की लवकर निघून जात नाहीत. त्यांना बाहेर घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तरीसुद्धा कबुतर तिथून जात नाहीत. कबुतरांच्या पंखांमुळे आणि विष्ठेमुळे फुफ्फुसांसंबधित आजार होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कबुतरांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी मुघलकाळातील सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहोत. हा उपाय नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य – istock)
कबुतरांना घाबरवण्यासाठी काळे फॉइल हा प्रभावी उपाय मानला जातो. यासाठी काळे फॉइल घेऊन घरातील जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळून खिडकीमध्ये किंवा कबुतर बसतात त्या ठिकाणी लावून ठेवावे. यामुळे सूर्याचा प्रकाश काळ्या फॉईलवर पडतो. या प्रकाशाला कबुतर घाबरतात. त्यामुळे हा उपाय केल्यास घराच्या आजूबाजूला कबुतर फिरकणार सुद्धा नाहीत.
घराच्या बाल्कनीमध्ये किंवा कबुतर राहत असलेल्या ठिकणी कॅक्टस किंवा इतर काटेरी वनस्पती लावून ठेवावी. या वनस्पतींना कबुतर अतिशय घाबरून जातात. काटेरी वनस्पतींजवळ कबुतर बसणे टाळतात. तसेच कबुतरांना चमकदार आणि काटेरी वस्तूंची खूप जास्त भीती वाटते. घराच्या बाल्कनीमध्ये तुम्ही साड्या, फॉइल किंवा कोणतीही चमकदार वस्तू ठेवू शकता.
कबुतरांना घाणेरड्या आणि तीव्र वासाची भीती वाटते. त्यामुळे पाण्यात व्हिनेगर, लसूण किंवा कांद्याचा रस, आल्याचा रस मिक्स करून बाटलीमध्ये स्प्रे तयार करून ठेवावा. यामुळे घरात कबुतर येणार नाहीत. बाल्कनी किंवा घराच्या आजूबाजूला सतत कबुतर येऊन बसत असतील तर कोणत्या तीव्र वासाच्या पदार्थाचा वापर करून स्प्रे तयार करावा. यामुळे कबुतर घरात येणार नाहीत. बऱ्याचदा घराच्या बाल्कनीमध्ये बर्ड स्पाइक्स बसवले जाते. यामुळे एसी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कबुतर बसत नाहीत.